वाहतुकीला अडथळा ठरणारे जीओ कंपनीचे पोल हटवून कंपनीवर कायदेशीर कारवाई न केल्यास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उपोषण करणार शहरात स्वच्छता गृहाचा मुतारींचा अभाव, चालू असलेल्या मुताऱ्या बंद केल्या मुख्याधिकाऱ्यावर मनमानीचा आरोप

0
266
जामखेड न्युज – – – – 
बीड रोड कॉर्नर ते नवीन पोलिस स्टेशन होणारा रस्ता ३८० मीटर लांब व १४ मीटर रुंद हा रोड जामखेड शहारातील सर्वात वर्दळीचा रस्ता आहे. सदरील रस्त्याच्या आवारात जामखेड पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय, न्यायलय, ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड महाविद्यालय जामखेड, जि.प.शाळा, सेतु, भुमि अभिलेख कार्यालय, कृषी कार्यालय असे सर्व महत्वाचे कार्यालय असल्याने रोडवर सतत गर्दीच असते आता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रोडचे काम चालु झाले आहे. नगरपरिषदेने रोडच्या दोन्ही बाजुचे अतीक्रमण हटवले परंतु वाहतुकीला अडथळा ठरणारे  रोड च्या मधोमध असनारे धोकादायक लाईटचे पोल जिओ कंपनीचे अनधिकृत पोल वरती नगरपरिषदेने काहीच कार्यवाही न करता नागरीकांच्या जिवाची पर्वा न करता रोड चे काम चालु केले आहे.
    या गंभीर प्रश्नांसाठी आम्ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जामखेड संघटनेच्या वतीने बांधकाम विभाग, नगरपरिषद, तहसील कार्यालय, महावितरण या कार्यालय मध्ये या विषयासंदर्भात पाठपुरावा केला. तसेच दोन महिन्या पुर्वी जामखेड  शहरात जी.ओ.कंपनीने अनधिकृत जे पोल उभे केले आहेत त्याची माहिती नगरपरिषदेचे मिनीनाथ दडंवते यांना विचारले असता सदरील जी.ओ. कंपनीने नगरपरिषदेकडुन कोणतीही परवानगी किवा ना हरकत घेतलेली नाही असे सांगण्यात आले. सदरील कंपनीने प्रांत अधीकारी व कलेक्टर साहेब यांच्या परवानगी ने काम सुरु झाले असे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते सांगुन ऊडवाऊडवीचे उत्तरे दिली पण शहरात नगपरीषदेच्या हद्दी मध्ये कुठलही खोद काम, व्यवसाय, कुठल्याही कंपनीच्या केबल्स, पाईपलाईन, टाॅवर्स चे काम करावयाचे असेल तर नगरपरिषदेची परवानगी घेऊन नंतर सदरील कामाचा शासकीय नियमानुसार कर भरावा लागतो. मग नेमके मुख्याधिकारी नी सदरील जी. ओ. कंपनीच्या कामाची माहिती असताना देखील त्यांनी जिवो कंपनीचे काम का थाबंवल नाही यात शंका निर्माण होते. आजपर्यंत मग असे अनेक कंपनीचे पाईप लाईन, भुमिगत केबल्स, गँस पाईपलाईन, टाॅवर्स चे कामे झाली आहेत मग ते पन या पध्दतीनेच विना परवानगी होऊन शासनाचा कर चुकऊनच झाली असावी अशी शंका निर्माण होत आहे. हे सर्व तपासण्याची गरज आज निर्माण झाली आहे. सदरील चालु असलेल्या रोड च्या कामासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी व कलेक्टर साहेब यांची नावे सांगुन वेळ ढकलली पण मी जेव्हा त्यांना परवानगीची प्रत द्या नाहीतर सदरील पोल काढुन त्या कंपनीवर कार्यवाही करा असे सांगितल्यानंतर सी. ओ. साहेबांनी जेसीबी बोलावून तेथील पोल स्व:त पाडले मग हीच कार्यवाही रोडच्या साईडचे अतीक्रमण हटवताना का केली नाही.
     गेली वर्ष दिड नगरसेवकांचा कार्यकाळ संपलेला असल्यामुळे नागरीकांना त्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी प्रशासक मुख्याधिकारी  दंडवते हे काम पाहत आहेत कामकाजासाठी वारंवार त्यांच्याकडे जावे लागते व त्यांना कामा संदर्भात जाब विचारयल्यास नागरीकांना उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात. सध्या नगपरीषदेमध्ये दंडवतेंचा मार्फत मनोमानी काराभार चालु आहे. जामखेड शहराची लोकसंख्या वाढत असताना शहरातील शासकीय नियमानुसार ठरावीक अंतरावर मुतारी बांधायला पाहीजे परंतु पुर्वी चालु असलेल्या एच. यु गुगळे यांच्या दुकान समोरील मुतारी  बीड कॉर्नर ची मुतारी बंद पडली आहे. विशेष म्हणजे ही की शहरात वारंवार मागणी करूनही नविन एकही  महिलांसाठी मुतारी आज पर्यंत बनवलेली नाही ही आपल्या सर्वांसाठी खुपच लाजीरवाणी गोष्ट आहे. जनतेने या सर्व गोष्टींसाठी व मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवला पाहीजे. तसेच सदरील जि. ओ. कंपनीवर नगरपरिषदेने कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा श्री शिवप्रतिष्ठान हिदुस्थानच्या वतीने उपोषण करण्यात येईल असे निवेदन श्री पांडुरंग मधुकर भोसले  श्री शिवप्रतिष्ठान हिदुस्थान तालुका प्रमुख यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here