जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
शिवजयंती निमित्ताने जामखेड येथे रविवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली महावीर मंगल कार्यालयात बिझनेस काॅन्फरन्सचे आयोजन मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड व जिव्हाळा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ.सुनंदाताई राजेंद्र पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या मार्गदर्शनपर चर्चा सत्रात उद्योजक व व्यावसायिक प्रशिक्षक डॉ.महेंद्र शिंदे, उद्योग भारतीचे संचालक महेश कडूस, उद्योजक संतोष पवार, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे आबासाहेब शिंदे, आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अरुण निमसे,खादी ग्रामोद्योगचे विजय डोंगरे आदि मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.तरी जामखेड व परिसरातील तरुणांनी व नव व्यावसायिकांनी जरुर सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.सदर कार्यक्रमास नांव नोंदणी आवश्यक आहे.