Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या आमदार रोहित पवारांची पावर वाढली – नगर, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्य़ातील पाच विधानसभा...

आमदार रोहित पवारांची पावर वाढली – नगर, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्य़ातील पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी

0
272
जामखेड न्युज – – – – 
 कर्जत जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तसेच उस्मानाबाद जिल्ह्य़ातील भूम परांडा व उस्मानाबाद सोलापूर जिल्ह्य़ातील पंढरपूर, करमाळा या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळेच आमदार रोहित पवारांची पावर वाढली आहे.
विधानसभा मतदारसंघात संघटना बांधणीची जबाबदारी त्यांच्या वर सोपवण्यात आली आहे. याबाबत आ. पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, आदरणीय @PawarSpeaks साहेब यांच्या सूचनेनुसार प्रांताध्यक्ष
@Jayant_R_Patil साहेब यांनी भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवलीय. पक्षादेशानुसार आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवे-जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या
सहकार्याने कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला जाईल आणि या विश्वासाच्या बळावरच आगामी सर्व निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!