आमदार रोहित पवारांच्या हस्ते सोलार प्रकल्पाचे उद्घाटन; शेतकऱ्यांची विजेची अडचण होणार कायमची दूर! मतदारसंघात आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून 150 कोटींचे सौर प्रकल्पाचे काम लागत आहे मार्गी! शेतकरी हितासाठी सोलार प्रकल्पातून होणार अखंड विजेचा पुरवठा, आमदार रोहित पवारांनी कुंभेफळ येथे केलं सोलार प्रकल्पाचं उद्घाटन!

0
210
जामखेड न्युज – – – – 
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे मतदारसंघात कायम नवनवीन शासकीय योजना आणत असतात. तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना त्याचा फायदा करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. कर्जत तालुक्यातील कुंभेफळ येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सोलार प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान, 3.80 मेगावॉट एवढी क्षमता असलेला सोलार प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर त्यातून दररोज 18 हजार युनिट विजेची निर्मिती होणार आहे. तसेच आंबिजळगाव विज उपकेंद्रामधून विद्युत पुरवठा होणाऱ्या आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तसेच ठराविक गावातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देण्यासाठीही मदत होईल. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आमदार रोहित पवारांनी मतदारसंघात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कर्जत-जामखेड मतदारसंघातील साकत, कौडगाव येथेही सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्याचबरोबर येत्या काळात खांडवी येथेही सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. मतदारसंघात सध्या एकूण 24 मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून होत आहे. त्याचा एकूण खर्च हा 150 कोटींच्या जवळपास आहे. सतत मतदारसंघात विविध माध्यमातून विकास कामे व शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोचवण्याचे काम आमदार रोहित पवार करत असल्याने नागरिकांकडूनही त्यांच्या कामाबद्दल कौतुक करून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया –
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने व ऊर्जा मंत्री नितीन राऊत, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मदतीने, मी शेतकऱ्यांच्या हितासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोलार प्रकल्पाचे काम कर्जत व जामखेडमध्ये करू शकत आहे. या प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना होईल व त्यांची विजेची अडचण या माध्यमातून कायमची दूर होईल, असा विश्वास आहे. – आमदार रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here