नगर जामखेड रस्त्यावर पोखरी जवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू

0
300

 

जामखेड प्रतिनिधी
           जामखेड न्युज – – – – 
   नगर- जामखेड रस्त्यावर पांढरी व पोखरी दरम्यान मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत खड्डे चुकवण्याच्या नादात कैलास सुरेश आरेकर वय ४७ जामखेड याच्या मोटारसायकल ला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे जामखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
        घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, प्रकाश मुरूमकर, गोकुळ जाधव, अमोल वराट यांनी आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी गेले असता रोडवर मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे खड्डे चुकवण्याच्या नादात एका वाहनाने मोटरसायकल वर चाललेला कैलास आरेकर यास जोराची धडक देउन  चार चाकी वाला फरार झाला आहे आरेकर  याचा जागीच मृत्यू झाल्यामुळे त्यास जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणून दाखल केले व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युवराज खराडे यांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती  कोठारी यांनी जामखेड चे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना माहिती दिली पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here