मोदींचे १५ लाख’ समजून घर बांधणे शेतकऱ्याला पडले महागात

0
274
जामखेड न्युज – – – 
मागील आठवड्यात चर्चेत आलेला आणि खात्यात जमा झालेले १५ लाख मोदींनी पाठवले समजून घर बांधणाऱ्या शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण १५ लाखामधून खर्च केलेले पैसे १५ दिवसात जमा करण्याची नोटीस जिल्हा परिषदकडून देण्यात आली आहे. तसेच पैसे देण्यास टाळाटाळ केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असेही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटने यांनी सांगितले.
                     ADVERTISEMENT 
       
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर जनार्धन औटे यांच्या, बँक ऑफ बडौदाच्या खात्यावर १७ ऑगस्ट २०२१ ला १५ लाख ३४ हजार ६२४ रुपये जमा झाले. बरेच दिवस वाट पाहूनही कुणीच विचारणा करत नसल्याने, निवडणुकीपूर्वी मोदींने दिलेलं आपलं आश्वासन पूर्ण करत आपल्याला पैसे पाठवले, असं औटे यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी त्यातील ९ लाख रुपये काढून घर बांधले. दरम्यान एका ग्रामपंचायतचे पैसे चुकून औटे यांच्या खात्यावर जमा झाल्याचं समोर आलं.
आता उरलेले ६ लाख रुपये प्रशासनाने बँकेला पत्र देऊन गोठवले आहे. तर खर्च केलेले ९ लाख रुपये पुढील १५ दिवसात जमा करण्याची नोटीस शेतकऱ्याला पाठवली आहे. त्यामुळे आता एवढे पैसे कुठून आणणार असा प्रश्न औटे यांना पडला आहे. तर दुसरीकडे पैसे देण्यास टाळाटाळ केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे ‘मोदींचे १५ लाख’ या शेतकऱ्यांला चांगलेच महागात पडले असल्याची चर्चा परिसरात पाहायला मिळत आहे.
आता पैसे कुठून देणार….
खात्यात १५ लाख ३४ हजार ६२४ रुपये जमा झाल्याचं शेतकऱ्याच्या लक्षात आल्यावर, ते पैसे मोदींनी पाठवलं असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यातील ९ लाख रुपये काढून शेतकऱ्याने घर बांधले. आता त्याच्याकडे ग्रामपंचायत पैसे परत करण्यासाठी दबाव आणत आहे. तर खात्यात जमा झालेले पैसे आपल्याला मिळाल्याचे वाटल्यानेच आपण ते खर्च केले, आता उरलेले ६ लाख व खर्च केलेली रक्कम आपण बँकेला व ग्रामपंचायतीला हप्त्या-हप्त्याने परत करू असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here