जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – (सुदाम वराट)
काळाबरोबर नवनवीन गोष्टी स्विकारणे ही नवले पाटलांची खासियत आहे त्यामुळेच सीएनजी फिलिंग स्टेशन जामखेडच नव्हे तर आसपासच्या दहा तालुक्यात प्रथमच होते यातुन वाहनधारकांना आर्थिक लाभाबरोबरच अनेक फायदे होतील असे आमदार रोहित पवारांनी श्री नवले सीएनजी फिलिंग स्टेशनच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी युवकांचे युथ आयकॉन आमदार माननीय रोहित पवार, लोकप्रिय आमदार सुरेश (आण्णा) धस यांच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी श्री. श्रीपादजी मांडके (CGD Head BGRL अहमदनगर,
दिनेशजी गाडगीळ, कैलासजी कुलकर्णी, रविराजजी दास,
प्रतिकजी गायकवाड, स्वप्निलजी मेटकर, युवराज फले, मनोज अडीगोपुलाजी श्री. संजय शंकरराव नवले पाटील (जि.प.सदस्य, बीड) व श्री. विनोद शंकरराव नवले पाटील (Dealer BPCL) (संचालक कृ.उ.बा.समिती,जामखेड)
यांच्या सह जामखेड, आष्टी, पाटोदा येथिल राजकीय नेते व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ADVERTISEMENT

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, काळाबरोबर आपणही नवनवीन गोष्टी स्विकारल्या पाहिजेत सीएनजी मुळे आर्थिक फायद्याबरोबरच इतरही अनेक फायदे मिळणार आहेत.
यावेळी बोलताना लोकप्रिय आमदार सुरेश धस म्हणाले की, जसे साखर कारखान्याने फक्त साखरेवर अवलंबून न राहता इथेनॉल सह इतर पर्याय शोधले पाहिजेत तसेच पंपाबाबतही प्रेट्रोल, डिझेल, आॅईल सह सीएनजी गरजेचे आहे यामुळे वाहनचालकांना फायदा होणार आहे.
यावेळी बोलताना श्रीपादजी मांडके (CGD Head BGRL अहमदनगर म्हणाले की, सीएनजी मुळे प्रदुषण कमी करण्याबरोबरच ३० ते ३२ टक्के आर्थिक फायदा होणार आहे. वाहनधारकांना एका ठिकाणी सर्व सेवा सुविधा मिळतील भविष्यात चार्जिंग स्टेशनही होईल.
नवले प्रेट्रोलियमचे संचालक विनोद नवले पाटील म्हणाले की, आम्ही जामखेड शहरात २०१९ मध्ये मे. श्री. नवले प्रेट्रोल पंप सुरू केला. आसपासच्या दहा तालुक्यात कोठेही सीएनजी पंप नाही ही वाहनधारकांची अडचण लक्षात घेऊन प्रथमच जामखेड शहरात सीएनजी फिलिंग स्टेशन सुरू करत आहोत. याचे अनेक फायदे आहेत आर्थिक फायदा, मायलेज वाढते, प्रदुषण कमी, संपुर्ण जिल्ह्यात एकच भाव असतो.
चौकट
पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमती यामुळे वाहन धारक आर्थिक अडचणीत आले आहेत तसेच
प्रदूषण कमी करण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. ते कमी करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी नैसर्गिक वायुचा वापर, इंधनासाठी केला जाणार आहे. त्याअनुषंगाने जामखेड शहरात प्रथमच नवले प्रेट्रोलियमतर्फे सीएनजी फिलिंग स्टेशन सुरू होत आहे. ही गोष्ट वाहनधारकांसाठी निश्चितच फायद्याची आहे.









