आमदार रोहित पवारांचा मंगळवारी जनता दरबार आमदार आपल्या दारी अभिनव उपक्रम

0
266
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – – – 
   मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी कार्यक्षम आमदार रोहित पवारांनी आमदार आपल्या दारी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यानुसार जामखेड येथे मंगळवारी १५ रोजी जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.
  कर्जत जामखेड मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार रोहित  पवार यांच्या संकल्पनेतून आमदार आपल्या दारी
हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमांतर्गत जामखेड तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महसूल विभाग, नगर परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, भूमी अभिलेख विभाग, महावितरण,  पोलिस प्रशासन अशा सर्व शासकीय विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत जामखेड येथील जगदंबा मंगल कार्यालय , खर्डा रोड येथे दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी  वरील विभागाशी कामाबाबतच्या योग्य त्या कागदपत्रांसह व अर्जांसह तसेच  समस्या सोडविण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन आ. रोहित पवार यांच्या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here