जामखेड प्रतिनिधी
आमदार रोहित दादा पवार यांच्या स्थानिक निधीतून आरणगाव सबस्टेशन अंतर्गत अरणगाव ,पाटोदा व पिंपरखेड 11 केव्ही फिडर शेती पंप विद्युत वाहिनीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, सुनील उबाळे, दीपक पाटील,संतोष निगुडे, नरेन्द्र जाधव,प्रदीप माने व शरद शिंदे स्थानिक कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रात प्रथमच आमदार निधीच्या माध्यमातून अशा प्रकारचे काम झाले आहे. जामखेड तालुक्यात आमदार निधीच्या माध्यमांतून 124 लक्ष रूपये खर्च करून अरणगाव सबस्टेशन अंतर्गत 3 आणि जवळा सब स्टेशन अंतर्गत 3 अशा शेतीसाठी 6 नवीन विद्युत वाहिन्या टाकण्यात येत आहेत. या विद्युत वाहिन्यांमुळे अनेक गावातील 5400 पेक्षा जास्त शेती पंप तर 620 रोहित्र जोडले जाणार असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठया प्रमाणावर लाभ होणार आहे. या 6 नवीन वाहिन्यांपैकी अरणगाव शेतीपंप विद्युत वाहिनीचे काम पूर्ण झाले असून यामध्ये 110 विद्युत रोहित्र या लाईनला जोडले गेले आहेत. या नविन लाईन मुळे 1600 शेती पंप आता सुरळीत चालू शकणार आहेत. याचबरोबर जवळा सबस्टेशन अंतर्गत जवळा, हळगाव व नान्नज अशा 3 तर अरणगाव सबस्टेशन अंतर्गत पिंपरखेड व पाटोदा या 2 विद्युत वाहिनी चे काम प्रगती पथावर असून या कामांचीही पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू आहे. आजपासून अरणगाव, कवडगाव, गिरवली तसेच चौंडी येथील शेतकरी बांधवांना अरणगाव येथील नवीन वाहिनीने पुरवठा होणार असल्याने येथील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.