जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड हे सहा वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. यांनी एका गुन्हयात न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रानुर चाललेल्या खटल्यात प्रथम वर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी आरोपी शिवराज चंद्रकांत पोवार यास जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सविस्तर असे की, किरकोळ कारणावरुन उचगाव उड्डाणपुलाजवळ २ जानेवारी २०१६ रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास राजवर्धन गवळी ( वय २० , रा . गवळी गल्ली , शनिवार पेठ ) याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता . त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं , मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला . या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता . तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात खटल्यात ११ साक्षीदार तपासण्यात आले . प्रत्यक्षदर्शी चार साक्षीदारांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या . समोर आलेले पुरावे , सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने खून प्रकरणातील आरोपी शिवराज चंद्रकांत पोवार ( वय २१ , रा . महाराणा प्रताप चौक , सोमवार पेठ ) याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचे
प्रथम वर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश एस . आर . पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
या खुनाच्या गुन्ह्याचे तपासी आमलदार तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे सद्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक आहेत. त्यांच्या चांगल्या कामाचा आलेख पाहता एक कर्तुत्ववान अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा उल्लेख होत आहे. त्यांनी अल्पावधीतच जामखेड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली वाहतुकीला शिस्त लावली, रोड रोमिओचा बंदोबस्त केला, खाजगी सावकाराविरोधात गुन्हे दाखल केले. गुन्हेगारीला आळा बसवत तालुक्यातील जनतेला स्थैर्य मिळवून दिले आहे. शाळा काॅलेज मधील मुला मुलींना पोलीस मित्र वाटू लागले. पोलीसांच्या कामाबद्दल विश्वास निर्माण झाला.




