जामखेड न्युज – – – – –
अहमदनगर जिल्हा हा आकारमानाचे राज्यात सर्वात मोठा जिल्हा आहे. सध्या ७३ जिल्हा परिषद सदस्य आहेत. आणी आता १२ सदस्य वाढणार आहेत त्यामुळे ८५ जिल्हा परिषद सदस्य होणार आहेत. तर पंचायत समितीचे १७० सदस्य राहणार आहेत ते पुढील प्रमाणे आहेत.
फेब्रुवारी 2017 मध्ये पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे 73 गट, तर 146 गण होते. अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण लोकसंख्या 36 लाख 4 हजार 668 आहे. सरासरी 42 हजार लोकसंख्येला एक जिल्हा परिषद गट व 21 हजार लोकसंख्येसाठी एक पंचायत समिती गण निश्चित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. आता 12 गट आणि 24 गणांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे नवीन गट आणि गणांची रचना करण्यासाठी सध्याचे गट आणि गणांची मोडतोड होणार आहे. राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. अहमदनगर जिल्हा परिषदेचे सर्वाधिक 85 गट व 14 पंचायत समित्यांसाठी 170 गण निश्चित करण्यात आले आहेत. राज्यात अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती गण सर्वाधिक राहणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्यापूर्वी एक ते दोन महिने अगोदर गट व गणांचा प्रारूप आराखडा तयार केला जातो. त्यावर हरकती मागविल्या जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे.
नवीन गट व गण अस्तित्वात येणार?
जिल्हा परिषद गट व गणाच्या कच्च्या आराखड्यात १२ गट व २४ गण
नव्याने अस्तित्वात येणार असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.
त्यांची नावे पुढीलप्रमाणे – १) संगमनेर खु. – (जि.प.गट, वडगाव पान
संगमनेर खुर्द गण),
२) सोनेवाडी – (जि.प. गट, सोनेवाडी व रांजणगाव
देशमुख गण),
३) साकुरी – (जि.प.गट, निमगाव कोहाळे व साकुरी गण),
४) निपाणी वडगाव- (जि.प.गट, निपाणी वडगाव व कारेगाव गण),
५) शिंगणापूर – (जि.प.गट, खरवंडी व शिंगणापूर गण),
६) अमरापूर (जि.प.गट, अमरापूर व आखेगाव गण),
७) अरणगाव – (जि.प.गट, अरणगाव व बुरुडगाव गण),
८) गुहा – (जि.प.गट, ताहाराबाद व गुहा
गण),
९) वडझिरे – (जि.प.गट, कान्हूर पठार व वडझिरे गण),
१०) पिंपळगाव पिसा – (जि.प.गट, देवदैठण व पिंपळगाव पिसा गण),
११) कोरेगाव – (जि.प.गट, कोरेगाव व अळसुंदे गण),
१२) साकत – (जि.प.गट, साकत व शिरुर गण).
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मार्च अखेपर्यंत होतील असा अंदाज आहे त्यामुळे इच्छुकांनी गावभेटी, लग्नसमारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमात मतदारांपुढे मिरवताना दिसतात.
ओबीसी आरक्षणाचाही सध्या निर्णय झालेला नाही त्यामुळे निवडणूका कशा होणार हा संभ्रम निर्माण झालेला आहे