बानाच्या सलग दोन षटकारांनी घडवला इतिहास, टीम इंडिया पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन

0
246
जामखेड न्युज – – – 
भारताचा युवा संघ पुन्हा एकदा अंडर 19 क्रिकेटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. अँटिंग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात यश धुलच्य़ा  नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडचा चार विकेट आणि 14 चेंडू राखून पराभव केला. विकेटकिपर दिनेश बानाने अखेरीस सलग दोन षटकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं._
विजयासाठी मिळालं होतं 190 धावांचं आव्हान
इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 190 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताच्या युवा टीमने कुठलाही धोका न पत्करता संयमाने फलंदाजी करत हे लक्ष्य पार केलं. सामन्यात एकवेळ भारताची चार बाद 97 अशी स्थिती होती. त्यावेळी ऑलराऊंडर निशांत सिंधु आणि राज बावाने पाचव्या विकेटसाठी 67 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. निशांत सिंधू (50) धावांवर नाबाद राहिला, तर राज बावाने (35) धावा केल्या.
राज बावाची अष्टपैलू कामगिरी
आजच्या सामन्याचा खरा नायक ठरला तो राज बावा. पाच विकेट आणि 35 धावा अशी अष्टपैलू कामगिरी त्याने केली. त्याला रवी कुमारने चांगली साथ दिली. रवी कुमारने 4 विकेट्स घेतल्या. फलंदाजीमध्ये शेख रशीद आणि निशांद सिंधू यांनी प्रत्येकी 50-50 रन केल्या आणि भारताचा विजय सोपा केला. 5 विकेट घेणाऱ्या राज बावाने  बॅटिंगमध्येही कमाल केली. 35 रनची महत्त्वाची खेळी करून बावा आऊट झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दिनेश बानाने एकापाठोपाठ एक असे सलग दोन षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.
टीम इंडिया अजिंक्य
_विशेष बाब म्हणजे यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने एकही सामना गमावला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा 45 रननी विजय झाला, तर आयर्लंडविरुद्ध 174 रननी, युगांडाविरुद्ध 326 रननी, बांगलादेशविरुद्ध 5 रननी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 96 रननी भारतीय टीम जिंकली होती._
पाचव्यांदा वर्ल्डकप चॅंम्पियन
भारताच्या अंडर-19 टीमने पाचव्यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे. एवढे वर्ल्ड कप जिंकणारी भारतीय टीम जगातली एकमेव टीम आहे.  याआधी   2000 साली मोहम्मद कैफ त्यानंतर 2008 मध्ये विराट कोहली 2012 मध्ये उनमुक्त चांद, 2018 मध्ये पृथ्वी शॉ आणि 2022 मध्ये यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले आहे. यापूर्वी 2020 मध्येही भारताने अंडर 19 वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली होती. पण अंतिम फेरीत बांगलादेशकडून पराभव झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here