गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
196
जामखेड न्युज – – – 
भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. महिनाभरापासून त्यांचे चाहते आणि कलाकार त्यांच्या प्रकृतीसाठी सतत प्रार्थना करत होते. मात्र आज त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे._
रुग्णालयात सुरू होते उपचार
लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. अगदी काही दिवसांपूर्वी त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी बातमी आली होती. त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्टही काढला होता. पण शनिवारी (5 फेब्रुवारी) त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. डॉ. प्रतीत सामदानी यांची टीम त्यांच्यावर ICU मध्ये उपचार करत होती.
40 हजारांहून अधिक गायली गाणी
अगदी सामान्य परिस्थितीतून अपार मेहनतीने त्यांनी कष्ट करून आघाडीची पार्श्वगायिका म्हणून स्थान निर्माण केलं. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत अनभिषिक्त गानसम्राज्ञी म्हणून नाव कमावलं. सर्व प्रकारची गाणी लतादीदी गायल्या आहेत. लता मंगेशकरांनी संपूर्ण कारकीर्दीत 40 हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. ‘आजवर इतका सुरेख आवाज ऐकलेला नाही’, असं म्हणत अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनीही गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्वराला दाद दिली होती.
भारतरत्नाने सन्मानित
2001 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. त्यापूर्वी त्या चित्रमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराच्याही मानकरी ठरल्या होत्या. याखेरीज फ्रेंच आणि ब्रिटीश सरकारचे सर्वोच्च नागरी सन्मानही लता मंगेशकर यांना मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here