डॉ. भगवानराव मुरुमकर यांच्या प्रयत्नातून सीडी वर्क पुल मंजूर

0
226
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – – 
   जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर मुरुमकर यांच्या प्रयत्नातून शिऊर येथील बिंडावस्ती, सोनारी वस्ती, काळंगे वस्ती, फाळके वस्ती वरील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागत होता ही अडचण ओळखून डॉ. मुरुमकर यांच्या प्रयत्नातून येथे सीडीवर्क पुल मंजूर करण्यात आला यांचे भूमिपूजन आज डॉ भगवानराव मुरुमकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
            शिऊर  ता जामखेड येथे मा सभापती डाॅ. भगवान (दादा )मुरुमकर यांच्या प्रयत्नाने १५ वित्त अयोग मधुन बिंडावस्ती,सोनारी वस्ती,कदम वस्ती,काळंगे वस्ती,फाळके वस्ती ,रोड वरिल सिडीवर्क (पुल) मंजुर करुन दिले,त्या वस्तीवरील नागरीकांचा सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागला,पावसाळ्यात ३/४ तास नागरीकांना ताटकळत थांबावा लागत होते,पुल होत आसल्याने नागरीकांनी समाधान मानले व डॉ भगवान दादा मुरुमकर यांनी आभार मानले  व त्याचे भुमीपुजन आज मा सभापती मा डाॅ भगवान दादा मुरुमकर यांच्या शुभ हस्ते पार पडले,
त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम आण्णा उतेकर, उपसरपंच विठ्ठल चव्हान, सरपंच हनुमंत उतेकर, उप- सरपंच विठ्ठल देवकाते, ग्रा पं सदस्य  बापु माने, डॉ नाना देवकाते, डेपुटी शिद्देश्वर लटके, भाऊ पिंपरे, सेवक फाळके, आकाश निकम, ज्ञानदेव तनपुरे चेअरमन, अंकुश तनपुरे, दादासाहेब कडु, तात्या काळे, राजेंद्र तनपुरे, केरबा कुमटकर, चंद्रकांत कडु,  भाऊ तनपुरे, दादा निकम,आप्पा फाळके,मा आत्माराम फाळके,मा भरत कडु, बापु फाळके, आत्माराम पाटिल, पं स अधिकारी  कुलकर्णी साहेब, ग्राकविकास आधीकारी सौ. इंगोले/भोसले मॅडम
यांच्या सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here