जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
जामखेड तालुक्यातील स्वर्गीय एम.ई. भोरे ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी अनिरूद्ध डाखरे हा ओ.बी.सी. प्रवर्गातुन निट २०२१ प्रवेश परिक्षेत या महाराष्ट्रसह मराठवाडा व विदर्भातुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला असल्याने त्याचा व तन्मय मोरे याचा सनराईज शैक्षणीक संकुलाचे अध्यक्ष डॉ. संजय भोरे व संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या सौ. अस्मीता भोरे-जोगदंड यांच्या उपस्थितीत स्वर्गीय एम. ई. भोरे ज्युनियर कॉलेज ता. जामखेड या संस्थेच्या ज्युनियर कॉलेज मधुन सन २०२१ ला बारावी सायन्स शाखेतुन उत्तीर्ण झालेला विद्यार्थी अनिरुद्ध नानाजी डाखरे हा सन २०२१ च्या परिक्षेत ओबीसी प्रवर्गातुन झालेल्या नीट परिक्षेत राज्यासह विदर्भ व मराठवाड्यातुन प्रथम आल्याने संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय भोरे, सचिव तथा प्राचार्या सौ अस्मीता भोरे-जोगदंड, बहीर सर, आयकर सर, भोडवे सर, कसाब सर, डिसले सर, मोहीते, कदम, पवार मॅडम, तेजस भोरे, यश भोरे, सातपुते सर, सुषमा भोरे, दिनकर सलगर, हनुमंत वाघमारे, बुवासाहेब दहिकर सर, महेश पाटील सह शालेय विद्यार्थी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ उपस्थित होते.
जामखेड तालुक्यातील पाडळी फाटा स्वर्गीय एम. ई.
भोरे ज्युनियर कॉलेज व सनराईज शैक्षणीक संकुलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय मुरलीधर भोरे सचिव तथा प्राचार्या सौ अस्मीता भोरे -जोगदंड यांनी अनिरूध्द डाखरे व तन्मय मोरे या आपल्या विद्यार्थाचा आदरपुर्वक ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन संस्थेच्या विद्यालयात सर्व कोव्हीड नियमाचे पालन करत त्यांच्या माता पित्याच्या साक्षीने सत्कार व सन्मान करुन त्यास त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या वेळी अनिरुद्धने उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन करत जिद्य, मेहनत व चिकाटीन अभ्यास केला तर यश हमखास मिळते असे सांगत सर्वानी भरपूर अभ्यास करून आपले व आपल्या शाळेबरोबर आई वडीलांचे नाव उज्वल केले पाहीजे. असे सांगीतले तसेच यावेळी उपस्थित असणारे त्याचे आई व वडील यानी संस्थेचे व शाळेचे चांगले मार्गदर्शन लाभल्यानेच आमची मुलं यशस्वी झाले असल्याचे आपल्या प्रतिक्रियेतुन स्पष्ट केले. संपूर्ण राज्यभरातुन त्यांचे कौतुक होत आहे.