जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. सद्यस्थितीत करोना विषाणूची तिसरी लाट सुरु झालेली असून तिसऱ्या लाटेत ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार मोठ्या झपाटयाने होत असल्याचे दिसून आलेले आहे.
कोरोना विषाणूच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत विषाणूचे रौद्ररूप आपण सर्वानीच अनुभवले असून करोना महामारीमुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत तसेच अनेकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे करावे लागणारे लॉकडाऊन म्हणजेच टाळेबंदी परवडणारी नाही. टाळेबंदीमुळे आर्थिक चक्र थांबते आणि त्याचा परीणाम अनेकांच्या रोजगारावर, व्यवसायावर होतो. जगातील अन्य देशांची परिस्थिती, अनुभव विचारात घेता ओमायक्रॉन विषाणू प्रकाराचा प्रसार कितीतरी पटीने अधिक होत असून बाधितांची संख्याही खूप मोठी आहे.
तिसऱ्या लाटेत जामखेड शहरातील रुग्ण संख्या मागील दहा दिवसांपासून वाढू लागलेली असून दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार कोरोना विषाणूचा प्रसार पुढील तीन आठवडयात शिखर गाठेल. सद्यपरिस्थिती तज्ञांचे अनुमान आणि कोरोना विषाणूचा पूर्वानुभव लक्षात घेता जामखेड मधील सर्व नागरिकांना खालीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे. लसीकरणसाठी पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. दुसऱ्या लाटेसारखी गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी गर्दीची ठिकाणे टाळावी. मास्कचा वापर करावा तसेच वारंवार हात स्वच्छ धुवावे. कोरोना विषाणूचा आणि त्यापासून होणाऱ्या हानीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे बनलेले आहे. कोरोना विषाणू प्रसार टाळणेसाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि होणारी संभ्याव्य हानी टाळावी असे जामखेड
नगरपरिषदच्या वतीने मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.