जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
परिसरातील शेतकर्यांच्या शेतातील विद्युत मोटारी चोरी होण्याच्या काही तक्रारी जामखेड पोलीस स्टेशनला दाखल झाल्या होत्या त्यानुसार जामखेड पोलीसांनी सापळा रचून मोटारचोर व त्यांचे साथीदार पकडले व त्यांच्या कडून चार मोटारी हस्तगत केल्या आहेत. मागील आठवडय़ात जामखेड पोलीसांनी तीन खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले होते आता विद्युत मोटार पकडले आहेत त्यामुळे जामखेड पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
गु.र.नं.20/2022 भादवि कलम 379, 34 प्रमाणे दिनांक 18/01/2022 रोजी दाखल झाला होता. सदर बाबत गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे तपास करीत होते.तपासादरम्यान दिनांक 20/1/2022 रोजी गुप्त बातमीद्वारा माहिती मिळाली की,सदरचा गुन्हा हा बाबा दयानंद खाडे रा.बाळगव्हाण शिवार ता.जामखेड याने केला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती मिळालेवरून तात्काळ बाबा दयानंद खाडे वय-21 वर्ष रा.बाळगव्हाण शिवार ता.जामखेड याचा त्याचे गावात व मित्राकडे शोध घेवुन तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन जामखेड पोलीस स्टेशनला आणले.पोलीस स्टेशनला आणुन त्याची सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
सदर गुन्हा करतेवेळी भाऊ नामे योगेश दयानंद खाडे व आरोपी बाबा खाडे याचा अल्पवयीन मित्र हे त्याचे साथीदार असल्याचे सांगितले आहे. बाबा दयानंद खाडे व त्याचा अल्पवयीन मित्र यांचेकडुन सदर गुन्हयातील गेला माल 1 शेती मोटारपंप व इतरदेखील आणखी त्यांनी चोरी केलेल्या इतर 3 शेतीमोटारपंप अशा एकुण 4 शेती मोटारपंप हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील साहेब , मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब , मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव साहेब ,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड ,पो.उप.नि.राजु थोरात ,पोना.संभाजी शेंडे ,पोना.अविनाश ढेरे, पोकॉ.संग्राम जाधव ,पोकॉ.संदिप राऊत ,पोकॉ.विजय कोळी ,पोकॉ.आबा आवारे ,पोकॉ.अरूण पवार ,पोकॉ.संदिप आजबे यांनी केली आहे .