जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
कर्जत-जामखेडच्या सर्वागीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात भरीव निधी उपलब्ध झाला असून अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत तसेच तसेच येत्या काळातही वेगवेगळी विकास कामे हाती घेतली जाणार आहेत. असे आमदार रोहित पवारांनी सांगितले त्या – त्या ठिकाणच्या नागरिकांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
आज गुरुवार दि. २७ रोजी शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, प्रा. मधुकर राळेभात, पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश आजबे, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, महेश राळेभात, अॅड हर्षल डोके, अमोल गिरमे, राजेंद्र गोरे, प्रकाश काळे यांच्या सह अनेकजण हजर होते.
आमदार रोहित पवार यांनी नविन बस स्थानक, पंचायत समिती दुसरा मजला, नविन पोलीस वसाहत कामाची पाहणी केली तसेच KVIC Awareness Program अंतर्गत महिलांना अगरबत्ती बनविणे प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, नागेश व कन्या विद्यालय येथे स्वच्छता गृह उद्घाटन करण्यात आले
शेतकर्यांना जोडधंदा मिळवण्यासाठी बायोप्लाॅक मत्स्यसंपदा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले यात ४३ पेक्षा जास्त युनिट आहेत यात शासनाची ६०%आहे.
यानंतर नान्नज गुरेवाडी पुलाचे भूमीपूजन करण्यात आले
याठिकाणी लोकांना पावसाळ्यात दोर लावून नदी पार करावी लागत होती तो पुल आता तयार होणार आहे.
जवळा येथे वेगवेगळ्या सहा ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय स्वच्छता गृह भूमीपूजन व तलाठी कार्यालय भूमीपूजन करण्यात आले. यानंतर चोंडी येथे दोन ठिकाणी सिमेंट रस्ता व तलाठी कार्यालय भूमीपूजन करण्यात आले