कोरोनाचा असाही भयंकर फटका!!! 2022 मध्ये तब्बल 20.7 कोटी लोक बेरोजगार राहणार!!!

0
188
जामखेड न्युज – – – – 
 सध्या जगभरासह देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावंत आहे. मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जग या कोरोना महामारीचा सामना करतंय. लसीकरणामुळे दिलासा मिळाला असला तरी अद्यापही धोका कायम आहे. अर्थात, आता सुरुवातीच्या काळातल्या लॉकडाउनसारखे कठोर उपाय योजले जाण्याची शक्यता कमी आहे; मात्र काही निर्बंध पाळणं अनिवार्य आहे.
दरम्यान, या सगळ्याचा रोजगार निर्मितीला सर्वाधिक फटका बसत आहे. कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळात अनेक उद्योगधंदे बंद पडले. परिणामी, भारतात लाखो, तर जगभरात कोट्यावधी नागरिकांचे रोजगार गेल्याचं समोर आलंय. परिस्थिती आता काहीशी सावरली असली, तरी आजही ती समाधानकारक नाही. आगामी काळातही बेरोजगारीचं सावट कायम राहणार असून, 2022 मध्ये जगातल्या बेरोजगारांची संख्या 20.7 कोटी असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनं नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात वर्तवला आहे.
जागतिक स्तरावर बेरोजगारांची संख्या 2023 पर्यंत कोविडपूर्व काळात बेरोजगार झालेल्या संख्येपेक्षा जास्तच राहील, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 2022 मध्ये जगभरात बेरोजगारांची संख्या 20.7 कोटी असेल. 2019 च्या तुलनेत ही संख्या 2 कोटींहून अधिक आहे. जीनिव्हातल्या युनायटेड नेशन्सच्या या एजन्सीने 2022 मध्ये रोजगार निर्मिती क्षेत्रातील विकास दर कमी असेल, असं म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here