दारू व गांजासाठी पैसे न दिल्याने खुन जामखेड पोलीसांनी खुन्याला एका दिवसात पकडले

0
245
जामखेड न्युज – – – 
 एका महिलेस दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र त्या महिलेने पैसे न दिल्याने तिचा दगडाने ठेचून व गळा आवळून खून केला. व नंतर पोलिस पकडतील या भीतीने नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात लपून बसलेल्या आरोपीस जामखेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
राजु ऊर्फ टिल्या बन्सी शिंदे असे त्या आरोपीचे नाव आहे. पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, दि.२२ जानेवारी रोजी सखुबाई बन्सी शिंदे (रा.हांगेवाडी, ता.केज, जि.बीड) हिला त्याच गावातील राजु ऊर्फ टिल्या बन्सी शिंदे याने दारु पिण्यासाठी व गांज्यासाठी पैसे दे असे म्हणुन भांडण केले. मात्र तीने त्याला पैसे दिले नाहीत त्यामुळे त्याने तिच्या दोरीने गळा आवळून तोंडावर नाकावर व हनुवटीवर मोठ्या दगडाने ठेचून जीवे मारले. अशी फिर्याद दिली होती.
त्यानुसार केज पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी राजु ऊर्फ टिल्या बन्सी शिंदे हा गुन्हा घडल्यापासून पसार झाला होता
तो जामखेड पोलिस स्टेशनच्या परीसरात राहत असल्याची माहिती जामखेड पोलिसांना मिळाली. त्यानुसार जामखेडच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास तो संशयास्पदरित्या वावरताना मिळून आल्याने त्याची चौकशी केली असता त्याने वरीलप्रमाणे गुन्हा केल्याची कबुली दिली.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलिस कॉन्स्टेबल संग्राम जाधव, संदिप राऊत, विजय कोळी, आबा आवारे, अरूण पवार, संदिप आजबे, सचिन देवढे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here