वूशू असोसिएशन ऑफ इंडिया व छत्तीसगड वूशू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय वूशू फेडरेशन कप वूशू स्पर्धा दिनांक २४ ते ३० डिसेंबर २०२५ दरम्यान राजनांदगाव (छत्तीसगड) येथे आयोजित करण्यात आली आहे.
या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी वूशू आयडियल स्पोर्ट अकॅडमी, जामखेड येथील खेळाडू योगेश वाघमोडे याची निवड झाली आहे. योगेशने आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर ही निवड मिळवून जामखेड तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे.
वूशू जिल्हा संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण उदमले तसेच उपाध्यक्ष श्याम पंडित यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली योगेशने वूशू क्रीडाप्रकारात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी योगेशची निवड झाल्याबद्दल जामखेड तालुक्यातील क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक, मित्रपरिवार व नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या स्पर्धेत तो उत्तम कामगिरी करून यश संपादन करेल, असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे.