राज्यातील शाळा लवकरच सुरू होणार – आदित्य ठाकरे

0
231
जामखेड न्युज – – – – 
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र शाळा सुरू करण्याबात वेगवेगळे मतप्रवाह होते. राज्यातील शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे.  आता शाळा सुरु करण्याबाबत आदित्य ठाकरेंने देखील  संकेत दिले आहे. त्यामुळे आज  हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. आज मुंबई महापालिका आणि कोविड टास्क फोर्ससोबत आदितेय ठाकरेंची बैठक पार पडली. या बैठकीत 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकर कोविड रुग्णसंख्येचा आढावा घेण्यात आला.  राज्यातील शाळा    लवकरच सुरु  करण्यास आदित्य ठाकरेंनी  अनुकुलता दर्शवली आहे.
                          ADVERTISEMENT
 
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि त्यापासून लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर आता राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटत असून त्याचा प्रभावही कमी झाला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी विविध घटकांतून केली गेली.
कोरोना नियमांचं पालन करुन राज्यातील शाळा सुरू कराव्यात. त्या संबंधी निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे असं राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. राज्यातील विविध समाजघटकांतून शाळा सुरू करण्यात याव्यात अशी सातत्याने मागणी होत होती. त्यावर विचार करुन तशा प्रकारचा प्रस्ताव आता शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.  दरम्यान, या विषयावर मंगळवारी राज्याच्या चाईल्ड टास्क फोर्सची एक बैठक झाली असून टास्क फोर्सचे सदस्यही राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here