जामखेड न्युज – – – –
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जन्मभूमीत शिल्पसृष्टी व बगीचामधील विविध पुरातन काळातील मुर्तीशिल्प तसेच देखावे व तेथून जवळून वाहणारी सिना नदीवर असलेल्या बंधा-याचे खोलीकरण व रूंदीकरणामुळे झाल्याने पाणीसाठ्यात झालेली वाढ यामुळे चोंडीच्या सौंदर्यात भर पडली असल्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे.
यामुळे याठिकाणी प्रि वेडींग, पोस्ट वेडींग, फॅमिली फोटोशुट, कपल फोटो व सेल्फी पॉंईट यासाठी पर्यटक अहिल्यादेवीच्या भुमित येत असल्याने रोजगाराचे साधने वाढत आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चोंडी हे वेड्याभाबळीने वेढलेले होते. माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी या पावनभुमित १९९५ पासून विकासाची मुहूर्तमेढ रोवली व ख-या अर्थाने विकासाला सुरुवात झाली. अहिल्यादेवीच्या जीवनावरील शिल्पसृष्टी, २५ फुट उंचीचा अहिल्यादेवींचा पुतळा व उद्यानमधील विविध झाडे पुरातन काळातील मुर्ती, देखावे व पर्यटनाचा दर्जा यामुळे यापूर्वी शालेय सहली व पर्यटक येत असे परंतु दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भामुळे पर्यटक दुर्मिळ झाले आहे.
अहिल्यादेवीच्या मंदीराशेजारील बगीच्या शेजारून सिनानदी वाहते. या नदीवर बंधारा आहे त्यामुळे थोडाफार पाणीसाठा होतो व तो जानेवारी अखेर तळ गाठतो. या नदीचे गांभीर्य ओळखून आ. रोहीत पवार यांनी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणसाठी मागील वर्षी या सिनानदीचे खोलीकरण व रूंदीकरण दोन्ही बाजूंनी करताना ५० हजार मेट्रिक टन गाळ काढून तो चोंडी, पिंपरखेड, हळगाव व गिरवली गावातील शेतकऱ्यांना शेतात टाकला यामुळे शेती सुपीक झाली व नदीचे पात्र दुप्पट वाढले यामुळे नदीला धरणाचे स्वरूप आले आहे.
नदीवर असलेल्या पुलाच्या खालील भागाला पाणी टेकले असल्याने ते हाताला लागत आहे. तसेच अथांग पाणी पसरल्याने व सुशोभीकरण केले आहे. अहिल्यादेवीची शिल्पसृष्टी, पुतळा व बगीचा याबरोबरच सिना नदीवरील अथांग पाण्यामुळे ३०० हेक्टर क्षेत्र बागायतखाली येत आहे अनेक नवदाम्पत्य, कुटुंब येथे प्रि वेडींग पोस्ट वेडींग व फोटो शुटसाठी इतर ठिकाणी जाण्यापेक्षा चोंडी येथे येत आहे. सिना नदीवरील बंधा-यात पर्यटकांना बोटींगची व्यवस्था आ. रोहीत पवार यांनी केली तर हे ठिकाण राज्यात प्रसिद्ध होईल.
चोंडीचे सरपंच आप्पासाहेब उबाळे यांनी सांगितले की, अहिल्यादेवीच्या जन्मभूमीत चोंडीचा विकास झाला आहे शिल्पसृष्टी, बगीचा अहिल्यादेवींचा पुतळा यामुळे पर्यटक येत होते कोरोनामुळे ते कमी झाले. आ. रोहीत पवार यांनी सिना नदीचे पात्र दोन्ही बाजूंनी खोलीकरण व रूंदीकरण करून नदीचे पात्र दुप्पट झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणिसाठा होऊन ३०० हेक्टर क्षेत्र बागायत होत आहे व चार गावांचा पाणीपुरवठा सुरळीत चालू आहे.