सन २०१८-२०१९ मधील खरीप अनुदान आणि २०१५-२०१६ मधील रब्बी अनुदान मिळणेकामी कागदपत्र जमा करावेत – तहसीलदार योगेश चंद्रे 

0
363
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – – – 
                  जामखेड तालुक्यात सन २०१८-२०१९ मधील खरीप अनुदान आणि २०१५-२०१६ मधील रब्बी अनुदान शासनाकडून मंजूर झाले होते.  सदर अनुदान जामखेड मधील सर्व शेतकरी यांच्या खात्यावर  वर्ग करण्यात आले होते.परंतु काही ठिकाणी बँक खाते क्रमांक चुकल्याने, सामायिक खाते असल्याने,  (आयएफएससी) ifsc कोड चुकल्याने किंवा इतर कारणाने ज्या लोकांच्या खात्यावर  अनुदानाचे पैसे वर्ग झालेले नाही त्या सर्व शेतकरी यांनी आपल्या गावाचे संबंधित तलाठी यांचेकडेस ३१ जानेवारी २०२२ अखेर  आपले बँक खाते पासबुक प्रत जमा करावे.
                      ADVERTISEMENT
      सदर अनुदान  मार्च २०२२ अखेर शासनाला  परत करावे लागणार असल्याने सर्व प्रलंबित खातेदार यांना प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते कि, आपण ३१ जानेवारी २०२२ अखेर  आपली माहिती आपले गावाचे संबंधित तलाठी यांचेकडेस जमा करावी जेणेकरून सदर अनुदानाची रक्कम खातेदारांना वाटप करता येईल. सदर माहिती न दिल्यास आणि त्यानंतर अनुदानाची रक्कम शासन स्तरावर वर्ग झाल्यास त्याची जबाबदारी या कार्यालयाची राहणार नाही याची सर्व खातेदार यांनी नोंद घ्यावी. प्रलंबित सर्व खातेदार यांची यादी कार्यालयाकडे असल्याने ज्यांना अनुदान वाटप झाले आहे अशा कोणीही खातेदार यांनी परत आपली माहिती देऊ नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here