Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड शहरात दरोडा टाकणारी टोळी जामखेड गुन्हे शोध पथकाकडुन जेरबंद- आरोपीकडुन गुन्हयातील...

जामखेड शहरात दरोडा टाकणारी टोळी जामखेड गुन्हे शोध पथकाकडुन जेरबंद- आरोपीकडुन गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत     

0
743
जामखेड प्रतिनिधी 
                जामखेड न्युज – – – – – 
    पंधरा दिवसांपूर्वी शहरातील शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात दरोडा टाकून पाच दरोडेखोरांनी हत्यारांचा धाक दाखवून रोख रक्कम व ऐवज लुटून नेला होता व मोठी दहशत निर्माण केली होती जामखेड पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत पंधरा दिवसांत चोरांना हत्यारासह जेरबंद केले आहे त्यामुळे जामखेड पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
फिर्यादी नामे विजय निवनाथ खुपसे वय 40 वर्षे धंदा नोकरी ( एस.टी.ड्रायव्हर) रा.शिक्षक कॉलनी बीड रोड, जामखेड, ता.जामखेड जि.अहमदनगर हे एस.टी.डेपो आष्टी येथे ड्रायव्हर म्हणुन नोकरीस आहेत. दिनांक 27/12/2021 रोजी पहाटे 03/00 वा.चे सुमारास फिर्यादी व त्यांचे घरातील सर्वजन राहते घरात दरवाजा बंद करुन झोपलेले असताना घरामागील किचनचा दरवाजा कशानेतरी तोडून अनोळखी पाच चोरट्यांनी घरात प्रवेश करुन फिर्यादी झोपलेले बेडरुम कडे तिघेजन आले व त्यापैकी एकाने फिर्यादीची गचांडी धरुन सुरा दाखवून बेडरुम पर्यंत ढकलीत नेवुन फिर्यादीस धमकावुन घरातील पैसे व सोने तसेच त्याचे पत्नीचे गळयातील व पुतनीच्या कानातील सोन्याचे दागिने बळजबरीने काढुन नेले आहे.म्हणुन जामखेड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. I 546/2021 भादवि क.395 सह आर्म ॲक्ट क.4/25 प्रमाणे फिर्याद दाखल केली होती. घटनास्थळी तात्काळ मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.आण्णासाहेब जाधव सो.कर्जत विभाग,जामखेड पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,गुन्हे शोध पथक पोसई.राजु थोरात व टीम,तसेच डॉग स्कॉड,फिंगरप्रिट ,स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांनी भेट दिली होती. सदरील घटना घडल्याचे अनुषंगाने वरीष्ठांनी तपासाच्या सुचना देवुन तपास पथके तयार केली होती.
                          ADVERTISEMENT
 
     सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात व गुन्हे शोध पथक करीत होते. गुन्हयाचा शोध करीत असताना पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात व गुन्हे शोध पथकाचे इतर पोलीस अंमलदार यांना गुप्त्‍ बातमीद्वारा बातमी मिळाली होती की , दिनांक 27/01/2022 रोजी रात्री 02/00 वा.च्या सुमारास नितीन ऊर्फ कव्या धनसिंग पवार व त्याचा साडु तसेच इतर साथीदार यांनीच सदरचा दरोडा टाकल्याची खात्रीदायक बातमी मिळाल्याने नितीन ऊर्फ कव्या धनसिंग पवार व जटा सुखलाल पारधी यांना तपासकामी दिनांक 4/01/2022 रोजी ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन सखोल विचारपुस केली असता आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली तसेच अजुन या गुन्हयात कोण कोण आरोपी आहेत याबाबत विचारले असता त्यांनी 3) अक्षय ऊर्फ काळया लाखन पवार ,रा.मिलिंदनगर, जामखेड, ता.जामखेड,
4) अनिल ऊर्फ लखन रतन ऊर्फ रवि काळे,रा.लिंपनगाव, ता.श्रीगोंदा,
5) संतोष ऊर्फ बुट्ट्या कंठीलाल पवार ,रा.खंडोबावस्ती, जामखेड, ता.जामखेड,
6) सुरज कान्हु पवार ,रा.मिलिंदनगर ,जामखेड, ता.जामखेड असा आम्ही सर्वानी मिळुन गुन्हा केला आहे.
 हे 4 आरोपी सध्या कोठे आहेत याबाबत विचारपुस केली असता ते सध्या जामखेडच्या आसपासच आहेत अशी माहिती दिल्यावरून आम्ही त्यांचा जामखेड हद्दीत शोध घेत असताना आरोपी हे जामखेड मध्ये आले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली लगेच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन टिम तयार करून जामखेड शहरातच 4 ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस स्टेशनला आणुन सखोल विचारपुस केली असता आम्ही गुन्हा केल्याचे कबुल केले असुन गुन्हयात तपासकामी अटक करून पोलीस कस्टडीमध्ये त्यांनी गुन्हयात सुरूवातीस उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर त्यांनी वापरलेले काही हत्यार व मुद्देमाल काढुन दिले आहे तो खालीलप्रमाणे आहे.
जप्त करण्यात आलेला किंमती मुद्देमाल खालीलप्रमाणे आहे.
1)सोने वेढा अंगठी 3 – वजन 3 ग्रॅम
2)सोने पेटी 2– वजन दीड ग्रॅम
3)सोने रिंगा गोल –वजन 2 ग्रॅम
4)सोने नथ 1 – वजन अर्धा ग्रॅम
5) सोने बुशी 1-वजन 4 ग्रॅम
6)सोने  ले.अंगठी 1- वजन 4 ग्रॅम
7)सोने मणीमंगळसुत्र –वजन 5 ग्रॅम
तसेच गुन्हयात वापरलेली जप्त करण्यात आलेली हत्यारे
1) लोखंडी तलवार
2) लोखंडी सुरा
3) स्क्रु डायव्हर
4) लोखंडी कटावणी
5) अँडस्टेबल लोखंडी पान्हा
6) लोखंडी खोलनी
           वरीलप्रमाणे आरेापीकडुन दरोडा टाकुन लुटलेला मुद्देमाल व हत्यारे तपासादरम्यान हस्तगत करण्यात आली आहे.
                         सदर गुन्हयातील आरोपी पोलीसांना चुकवून ब-याच दिवसापासुन फरार होते. पंरतु जामखेड पेालीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथक त्यांचे मागावर होते अखेर त्यांचा सुगावा लागल्याने सदर गुन्हयात 1)नितीन ऊर्फ कव्या धनसिंग पवार रा.गोरोबा टॉकी,जामखेड हल्ली रा.पोखरी ता.आष्टी जि.बीड,2) जटा सुखलाल पारधी रा.जमनीटोला ता.सोहादपुर जि.होशिंगाबाद राज्य मध्यप्रदेश,3) अक्षय ऊर्फ काळया लाखन पवार ,रा.मिलिंदनगर, जामखेड, ता.जामखेड, ,4) अनिल ऊर्फ लखन रतन ऊर्फ रवि काळे,रा.लिंपनगाव, ता.श्रीगोंदा, ,5) संतोष ऊर्फ बुट्ट्या कंठीलाल पवार ,रा.खंडोबावस्ती, जामखेड, ता.जामखेड,6) सुरज कान्हु पवार ,रा.मिलिंदनगर ,जामखेड, ता.जामखेड यांना अटक करून त्याच्याकडुन 20 ग्रॅम व गुन्हयात वापरलेली हत्यारे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे. तसेच त्यांचेकडुन इतर काही गुन्हे उघडकीस आले असुन तसेच त्यांचेवर खालीलप्रमाणे पुर्वीचे गुन्हे दाखल आहेत.
1)नितीन ऊर्फ कव्या धनसिंग पवार रा.गोरोबा टॉकी,जामखेड हल्ली रा.पोखरी ता.आष्टी जि.बीड
अ.क्रं. गु.र.नं. कलम पोलीस स्टेशन
1 I 41/2003 भादवि कलम 454,457,380 निगडी पोलीस स्टेशन,पुणे
2 I 19/2008 भादवि कलम 143,147,323 जामखेड पो.स्टे.
3 I 01/2005 भादवि कलम 454,457,380 जामखेड पो.स्टे
4 I 80/2015 भादवि कलम 399,402 जामखेड पो.स्टे
5 I 188/2018 भादवि कलम 399 बीड
6 I 198/2019 भादवि कलम 399,402 आष्टी
7 II 04/2005 मुंबई पोलीस कायदा कलम 122 जामखेड
8 III 37/2017 मुं.प्रो.का.कलम 65(ई) आष्टी
9 III 264/2019 मुं.प्रो.का.कलम 65(ई) आष्टी
10 III 67/2015 मुं.प्रो.का.कलम 65(ई) आष्टी
11 III 361/2017 मुं.प्रो.का.कलम 65(ई) आष्टी
12 III 51/2015 मुं.प्रो.का.कलम 65(ई) आष्टी
13 III 41/2015 मुं.प्रो.का.कलम 65(ई) आष्टी
2)सुरज कान्हु पवार रा.मिलिंदनगर ,जामखेड, ता.जामखेड
अ.क्रं. गु.र.नं. कलम पोलीस स्टेशन
1 I 07/2006 भादवि कलम 379,511 औरंगाबाद
2 I 192/2014 भादवि कलम 399 जामखेड
3 I 80/2015 भादवि कलम 439,399,402 जामखेड
4 I 48/2015 भादवि कलम 379,34 जामखेड
5 I 07/2016 भादवि कलम 454,457,380 मिरज सांगली
6 I 704/2020 भादवि कलम 457,380 जामखेड
7 I 344/2021 भादवि कलम 457,380,411 कराड ,सातारा
3) अनिल ऊर्फ लखन रतन ऊर्फ रवि काळे रा.लिंपनगाव, ता.श्रीगोंदा
अ.क्रं. गु.र.नं. कलम पोलीस स्टेशन
1 I 07/2016 भादवि कलम 454 ,457,380 मिरज,सांगली
2 I 67/2020 भादवि कलम 366(अ) 376 नाशिक
3 I 245/2019 मुं.पा.का.कलम 135 पुणे
4) संतोष ऊर्फ बुट्ट्या कंठीलाल पवार ,रा.खंडोबावस्ती, जामखेड, ता.जामखेड
अ.क्रं. गु.र.नं. कलम पोलीस स्टेशन
1 I 73/2007 भादवि कलम 379,34 जामखेड
2 I 153/2011 भादवि कलम 379,34 जामखेड
3 I 156/2017 भादवि कलम 379,34 जामखेड
4 I 248/2018 भादवि कलम 399 सासवड,पुणे
5 I 248/2019 भादवि कलम 399 पुणे
6 II 04/2019 मुं.पो.का.कलम 122 सासवड,पुणे
                         सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील साहेब , मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब , मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव साहेब ,यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड , पो.उप.नि.राजु थोरात ,पोना.अविनाश ढेरे, पोकॉ.संग्राम जाधव ,पोकॉ.संदिप राऊत ,पोकॉ.विजय कोळी ,पोकॉ.आबा आवारे ,पोकॉ.अरूण पवार ,पोकॉ.संदिप आजबे ,पोकॉ.सचिन देवढे  यांनी केली आहे .
     जामखेड पोलीसांच्या कामगिरीबद्दल पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!