जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
तालुक्यातील खर्डा येथे सेवानिवृत्त भूमिपुत्रांचा सेवापूर्ती समारंभ जामखेड पंचायत समिती सभापती तथा राष्ट्रवादीचे नेते सुर्यकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी खर्डा येथील सेवानिवृत्त सैनिक व मुख्याध्यापक यांचा सत्कार ग्रामस्थांनी केला. सेवानिवृत्त मुख्याध्यापक अभिमान गोपाळघरे, सेवानिवृत्त सैनिक बाळासाहेब गोपाळघरे, बलराम गोपाळघरे, अशोक मुंडे, बाळासाहेब जाधव, रावसाहेब जाधव, हनुमंत बारगजे, आसाराम गोपाळघरे या सेवानिवृत्त मुख्याध्यापक व सैनिकांचा सेवापूर्ती सोहळा सत्कार करून साजरा करण्यात आला.
ADVERTISEMENT 

सत्कार प्रसंगी सेवानिवृत्त सैनिकांनी जीवघेणे प्रसंग, बंदुकीच्या गोळीची केलेला सामना, अतिरेकी व भारतीय सीमेवर सीमेपलीकडील दुश्मन सैन्याशी धैर्याने तोंड देत केलेले विविध चित्तथरारक अनुभव प्रसंग सैनिकांनी सांगतात उपस्थितांचे मनभरून आले आपले स्थानिक ग्रामस्थ कडून केलेला हा आदर सत्कार हा भारतीय सेवेमध्ये हजर असताना केलेल्या कामामुळे स्थानिकाकडून झालेला सत्कार हा आमच्यासाठी खूपच आदर्शवत व स्फूर्तीदायक असा सत्कार असल्याचे मनोगत उपस्थित सेवानिवृत्त सैनिकांनी केले.
ADVERTISEMENT

यावेळी जामखेड तालुका राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे तालुकाध्यक्ष तुळशीदास गोपाळघरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, कार्यकमासाठी डॉ अंकुश गोपाळघरे, डॉ.राजेंद्र नागरगोजे, प्रा आदिनाथ खेडकर, अमोल जायभाय,प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वर कौले,परशुराम देशमुख, रवी पवार ,बाळासाहेब बर्डे, बबन बारगजे , तात्या होडशीळ , भारत सानप , गोरख गोपाळघरे , ओंकार बारगजे यांच्यासह जय भगवान युवा मंचाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक परशुराम देशमुख प्रस्ताविक तुळशीदास गोपाळघरे व आभार विकास सौने यांनी व्यक्त केले.