नकली घोड्यावर बसणाऱ्या ‘मैने’ला पद्म पुरस्कार दिला जातो पण…”, रोहित पवारांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा समावेश महापुरुषांच्या यादीत करण्याची केंद्राकडे रोहित पवारांनी केली मागणी

0
252
जामखेड न्युज – – – – – 
 राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपल्या बेताल वक्तव्याने नेहमीच चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतवर (Kangana Ranaut) निशाणा साधत टोला लगावला आहे. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबाबतीतील चुकीच्या शोधाची दुरुस्ती करुन त्यांचा समावेश महापुरुषांच्या यादीत करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले आहे की,’नकली घोड्यावर बसून सामाजिक दुहीचा सूर आळवणाऱ्या ‘मैने’ला पद्म पुरस्कार दिला जातो. पण ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काह्यली’ या लावणीतून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राण फुंकणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मात्र केंद्र सरकारच्या दृष्टीने ‘प्रतिष्ठित’ नाहीत. कथा, लोकवाङमय, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, गण, गवळण, प्रवास वर्णन अशी विपुल साहित्य सेवा केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबाबतीतील चुकीच्या शोधाची दुरुस्ती करुन त्यांचा समावेश महापुरुषांच्या यादीत करावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करत रोहित पवार यांनी अभिनेत्री कंगना रनौतलाही अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
दरम्यान रोहित पवार यांनी आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीतील चुकीच्या शोधाची दुरुस्ती करुन त्यांचा समावेश महापुरुषांच्या यादीत करण्याची मागणी करून केंद्रातील सत्ताधारी भाजपचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे आता हा प्रश्न भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील चर्चेचा विषय ठरू शकतो. तर दुसरीकडे आपल्या बेताल वक्तव्याने नेहमीच चर्चेत असणाऱ्या कंगनालाही रोहित पवार यांनी निशाण्यावर धरले आहे. या अगोदर कंगना रनौत हिने भारतीय स्वातंत्र्यलढयाबाबत बेताल वक्तव्य करत वाद निर्माण केला होता. आता रोहित पवार यांच्या अप्रत्यक्ष टीकेला कंगना काय प्रतिउत्तर देते हे पाहणेही उत्सुकाचे ठरणार आहे. तसेच भाजप रोहित पवार यांच्या मागणीला कितपत गंभीर घेते तेही आता उत्सुकाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here