जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्त्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
नऊ विद्यार्थांनी पारितोषिक पटकावले
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक दत्ता काळे होते यावेळी राजकुमार थोरवे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अशोक घोलप, जाहेद बागवान, सुलभा लवुळ, अतुल दळवी, आण्णा विटकर सह सर्व विद्यार्थी हजर होते.
यावेळी सिद्धी मुरुमकर, प्रणिती मुरुमकर व लक्ष्मी वराट यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला तसेच राधिका शिंदे, ऋतुजा वराट, प्रियंका डोके, श्रेया वराट, प्रतिक्षा तांबे यांनाही पारितोषिक मिळाले.
सर्व विजयी स्पर्धकांना आण्णा विटकर, महादेव मत्रे व राजकुमार थोरवे यांच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक दत्ता काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम वराट यांनी तर आभार राजकुमार थोरवे यांनी मानले.