जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचा वाढदिवस साकत मध्ये कांतीलाल वराट यांच्या शिवालय होलसेल अॅण्ड ट्रेडर्स दुकानात मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मोठय़ा संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
साकतमध्ये कांतीलाल वराट यांच्या शिवालय होलसेल अॅण्ड ट्रेडर्स दुकानात माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी भेट दिली असता त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कांतीलाल वराट सह साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट सर, ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट, नागेश वराट, माजी ग्रामपंचायत सदस्य पोपट वराट, पत्रकार बाळासाहेब वराट यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.