कर्जतच्या प्रांत कार्यालयाबाहेर गोळीबार – देवस्थानच्या जमिन वादातून गोळीबार

0
303
जामखेड न्युज —–
तालुक्यातील रेहकुरी येथील कोकनाथ महादेव देवस्थानची जमीन नावावर करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून
आरोपी संदीप छगन मांडगे यांने कर्जत मध्ये प्रांत कार्यालयाबाहेर रिवाल्वर मधून हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली होती. मात्र
घटनास्थळी पोलीसांनी तातडीने धाव घेतली व गोळीबार करणारा संदीप मांडगे यास अटक केल्याने तणाव निवळला.
     याबाबत सविस्तर असे की, कर्जत तालुक्यातील रेहकुरी येथील कोकनाथ महादेव देवस्थानचे गट नं. ७०,७१,७२,७३ मध्ये एकुण ७५ एकर क्षेत्र आहे. ते बरेच वर्षापासून ४ कुटूंब वहीत करून शेत जमिन करीत होतो व कोकनाथ महादेव मंदिराची आम्ही देखभाल करीत होतो. परंतु संदिप छगन मांडगे याने वरील शेत जमीनच्या क्षेत्रावर देवस्थानाचे नावाने ट्रस्ट स्थापन करून त्याचे घरातील सदस्य यांना अध्यक्ष व सभासद केलेले आहेत. मात्र संदिप छगन मांडगे व इतर भावकीतील ईतर लोकांचा संबंध नाही.
   यावरून इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी कर्जत येथील उपविभागीय दंडाधिकारी यांचे कडे दावा दाखल केलेला आहे. या दाव्याची  दि.३० डिसेंबर रोजी उप विभागीय दंडाधिकारी कर्जत  येथे सुनावणीची तारीख असल्याने मी व आमचे भावकीतील इतर मंडळी कर्जत येथे आलो होतो.
  सुनावणी झाल्यानंतर भारत मांडगे शांतीलाल मांडगे,  रोहीदास मांडगे, शहाजी  मांडगे, आश्रु  मांडगे, भानुदास  मांडगे, हारीभाऊ  मांडगे, नारायण  मांडगे, आप्पा मांडगे, धनराज मांडगे, सर्व रा. रेहकुरी ता. कर्जत असे  उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या गेटजवळ थांबले असताना यातील आरोपी संदिप छगन मांडगे वय ३२ वर्षे सचिन छगन मांडगे वय ३० वर्षे दोन्ही रा. रेहकुरी ता. कर्जत असे आले
    त्यावेळी फिर्यादी भरत मांडगे यांचा चुलत भाऊ शहाजी मांडगे याने त्याची मोटार सायकल घरी घेवून जाण्याचे सांगितले. त्यावेळी सदर मोटारसायकल घेवून घरी जात असताना आरोपी संदिप छगन मांडगे भरत मांडगे यांना म्हणाला ए कुत्रया तु मोटारसायकल घेवून जावू नको खाली उतर असे म्हणून त्याने फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी करून चापटाने मारहान केली. त्यावेळी आरोपी व फिर्यादी या दोघामध्य शाब्दीक बाचाबाची होवून झटापट चालू असताना संदिप मांडगे याने त्याचे कंबरेचा रिव्हालव्हर काढून हवेत फायर केला. त्यानतंर संदिप मांडगे हा निघून गेला. या बाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार शाम जाधव, पांडुरंग भांडवलकर, अमित बर्डे, उद्धव दिंडे यांनी घटनास्थळास भेट देऊन आरोपीस हत्यारासह ताब्यात घेतले. याबाबत इतरांचे जीवित धोक्यात येईल अशी कृती करणे आणि भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस ताब्यात घेतले आहे, रिव्हॉल्वर आणि बुलेट(गोळ्या) जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत भरत नामदेव मांडगे वय 45 वर्षे धंदा शेती रा. रेहकुरी ता. कर्जत याने कर्जत पोलीस स्टेशनला  फिर्याद दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here