जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
शहरातील नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत आहे. अनेक लोकांचा व लहान मुलांचा या कुत्र्यांने चावा घेतला आहे यात अनेकजण जखमी झाले आहेत. तसेच रस्त्यावर स्वच्छ ठिकाणी मोठय़ा प्रमाणात कुत्रे घाण करतात यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले तेव्हा नगरपरिषद प्रशासनाने ताबडतोब या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आपल्या जामखेड शहरामध्ये मोकाट कुत्र्याने थैमान घातले आहे कित्येक जणांना चावा पण घेतलेला आहे येणाऱ्या जाणाऱ्या लहान मुलांना व नागरिकांना त्रास होत आहे तरी वरील विषयन्वये काळजीपूर्वक दखल घेण्यात यावी व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा ही नम्र विनंती निवेदनात नगरपरिषद प्रशासनाला आजबे यांनी केली आहे.