लग्नाला 50 तर अंत्यविधीला 20 लोकं, सरकारची नवी नियमावली जारी

0
223
जामखेड न्युज – – – – 
 सध्या देशातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 82,000 एवढी आहे. यातच गेल्या 24 तासांत देशभरात 10 हजारांहून अधिक नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आज तब्बल 4000 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. त्याअनुषंगाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. त्यानंतर, राज्य सरकारच्या आपत्ती विभागाने परिपत्रक जारी करत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. आज मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू होत आहेत. 30 डिसेंबर 2021 रोजी हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. लग्नाला 50 तर अंत्यविधीला 20 लोकं, सरकारची नवी नियमावली जारी
ओमायक्रॉन आणि वाढती कोरोना पॉझिटीव्ही रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्यातील टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली होती. त्यानंतर, नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. सरकारच्या नव्या नियमावलीनुसार राज्यात 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. त्यानुसार गर्दी टाळण्यासाठी काही महत्वाचे आदेश देण्यात आले आहेत.
सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत.अंत्यसंस्कारासाठी 20 लोकस्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभापर्यटनस्थळावर जमावबंदी लागू
काय म्हणाले होते आरोग्यमंत्री
”मुंबईत काल 2200 च्या दरम्यान रुग्ण आढळून आले होते, आज हीच रुग्णसंख्या 4 हजारांच्याजवळ पोहोचली आहे. मुंबईत एका दिवशीची आजची पॉझिटीव्हीटी 8.48 एवढी आहे. ठाण्याची 5.25, रायगड 4, पुण्याची 4.14 याचा अर्थ असा आहे की, 100 टेस्टमागे 5 ते 8 पर्यंत रुग्ण आढळून येत आहेत. आजची परिस्थिती नक्कीच चिंता वाढवणारा विषय आहे. टास्क फोर्स आणि इतरांनी जी चर्चा केली. त्यानुसार, अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात घेणार आहेत. आज किंवा उद्या याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील,” असे राजेश टोपे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here