जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
कोविड १९ व ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जामखेड तहसिल प्रशासन, पोलीस स्टेशन व नगर परिषदेच्या वतीने संयुक्तरित्या दंडात्मक कारवाईस करण्यात आली असून या माध्यमातून विनामास्क असणाऱ्या ७ जणांकडून ३५००, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १३ जणांकडून २६००, मोटार वाहन कायद्यान्वये १३ जणांकडून ६५०० अशा प्रकारे एकूण ३३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकुण १२६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली आहे.
देशासह महाराष्ट्र राज्यात वाढत जाणार कोविड १९ व ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार गंभीर पावले उचलत असून
आज जामखेड शहरात तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी कारवाईची मोहिम सुरू केली असून संपूर्ण शहरात ही मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी पोलीस व नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने कारवाई करत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान विना मास्क वाहन धारक व व्यवसाईक यांचेकडून मोठा दंड वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे आज दि. ३० पासून नागरिकांनी रस्त्यावर येताना बिना मास्क येऊ नये अन्यथा आपल्याला मोठा आर्थिक भुर्दंड बसू शकतो.
ही कारवाई व्यापकरित्या व कठोरपणे राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.