जामखेड न्युज – – – –
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील अहमदनगर ते कडा या ४१ किलोमीटर अंतरावर बुधवारी (ता.२९) बारा डब्यांची रेल्वेची चाचणी घेण्यात आली असून दुपारी २ वाजता सदरील रेल्वे कडा येथून आष्टी येथे येणार असून दुपारी ४ वाजता आष्टी रेल्वे स्थानकावर खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून नंतर हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आष्टी ते अहमदनगर हायस्पीड रेल्वे धावणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोलापूरवाडी ते आष्टी या ३१ किलोमीटर अंतरावर पहिल्यांदा हाय स्पीड रेल्वे धावणार असल्याने बीड जिल्हा वासियांचे रेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण होत असताना दिसून आले. परंतु सदरील रेल्वे बीड व परळी पर्यंत कधी धावणार अशी चर्चा जिल्हावासीयांतुन होत आहे.अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गाला १९९५ साली तत्वतः मान्यता मिळाली होती. हा रेल्वे मार्ग पूर्ण होण्यासाठी जिल्ह्याच्या दिवंगत खासदार केशरकाकू क्षिरसागर, दिवंगत गोपीनाथराव मुंडे, खासदार रजनी पाटील, खासदार प्रीतम मुंडे यांनी या रेल्वेमार्गासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या रेल्वे मार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने रेल्वेच्या कामाने गती घेतली आहे. त्यामुळे अहमदनगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावरील लोहमार्गाचे काम पूर्ण झाले. अहमदनगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावर बुधवारी हाय स्पीड रेल्वे (ताशी १४४ किलोमीटर) बारा डब्यांसह धावणार आहे. आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी व कडा येथील रेल्वे स्थानकावर नागरिकांच्या वतीने दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वागत केले.
आजपर्यंत असा मिळाला निधी३१ मार्च २०२१ पर्यंत केंद्र सरकारने १ हजार ५५७ कोटींचा खर्च केला आहे. २०२१-२२ साठी २४९ कोटींची तरतूद केल्याचे रेल्वेने कळवले आहे. राज्य शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत १३३२.८७ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.राज्य सरकारचे अभिनंदनअहमदनगर बीड परळी रेल्वे प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारने समान निधी देण्याचे निर्देश आहेत. राज्य सरकार या रेल्वेमार्गासाठी पुन्हा ९० कोटी रुपयांचा निधी देणार असल्याने राज्य सरकारचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच भाजपाचे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.
आज पर्यंत अशी धावली रेल्वे१. १७ मार्च २०१८ रोजी अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान सात किलोमीटरवर सात डब्यांच्या रेल्वेची चाचणी घेण्यात आली होती.२. २५ फेब्रुवारी २०१९ रोजी नारायणडोह ते सोलापूरवाडी या १५ किलोमीटर अंतरावर सात डब्यांची रेल्वे चाचणी घेण्यात आली होती.३. ९ डिसेंबर २०२१ रोजी दोन डब्याची रेल्वेची चाचणी आष्टी पर्यंत घेण्यात आली होती.४. बुधवारी (ता.२९) बारा डब्यांची रेल्वे सोलापूरवाडी ते आष्टी ३१ किलोमीटर अंतरावर (ताशी १४४ किलोमीटर) हाय स्पीडने दुपारी ४ वाजता धावणार आहे.रेल्वे पाहण्यासाठी नागरिकांनी केली गर्दीअहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गावर बुधवारी (ता.२९) बारा डब्यांची रेल्वे चाचणी घेऊन बीड जिल्हा वासियांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होत असल्याने सोलापूरवाडी धानोरा कडा या ठिकाणी रेल्वे पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.