जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते धनराज पवार यांना मनुष्यबळ विकास अकादमी मुंबई, यांच्या वतीने सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा २०२१ चा कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार पुणे येथे १३ फेब्रुवारी २०२२ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
धनराज पवार यांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल निर्वाण फाउंडेशन या संस्थेनी दिलेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल धनराज पवार यांचे अहमदनगर (दक्षिण) जिल्ह्यातील खासदार, आमदार, अधिकारी, प्रतिष्ठित व्यापारी, विविध संघटना,पक्षाचे ता.अध्यक्ष व पदाधिकारी , कार्यकर्त्यानी विशेष कौतुक केले.
*पुरस्काराने सम्मानित*
* निर्वाण फौंडेशन,२०२१ आंतरराष्ट्री य पुरस्कार – कोरोना काळातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
* मानव अधिकार सुरक्षा संघ, दिल्ली- कोरोना योद्धा पुस्कार
*बहुउद्देशीय सामाजि
पारंगाव, जि. उस्मानाबाद – सामाजिक क्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्कार ( समाज रत्न पुरस्कार)
* मदर तेरेसा सामाजिक फौडेशन, उत्तर प्रदेश – कोविड योद्धा पुरस्कार २०२०
*दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स & इंडस्ट्रिज पुणे- कोविड योद्धा पुरस्कार २०२०
* विश्वशक्ति इंटरनेशनल फौंडेशन , पुणे- समाज भुषण पुरस्कार २०२०
*अंबाई फौंडेशन , अमरावती – प्रेरणादायी कोरोना वीर राज्यस्तरीय पुरस्कार
* महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटना, पुणे – कोविड योद्धा पुरस्कार
* अखिल भारतीय तेली महासभा, दिल्ली – कोरोना योद्धा
* अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्र लेखक संघ, विश्वात्मक मराठी साहित्य परिषद, मुंबई – राज्यस्तरीय कोविड योद्धा समाज रक्षक पुरस्कार