चितेला अग्नी देणार तितक्यात त्यानं उघडले डोळे आणि…

0
383
जामखेड न्युज – – – 
एखाद्या चित्रपटात किंवा मालिकेमध्ये मरण पावलेला व्यक्ती उठून बसला असं आपण बघत असतो. मात्र खऱ्याखुऱ्या आयुष्यात अशी घटना घडली असल्याचं तुम्ही क्वचितच ऐकलं असेल. कोरोना काळात याचा प्रत्यय देणारी काही उदाहरणं देखील तुम्ही पाहिली असतील. मात्र एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे.
दिल्लीतील एका वृद्धाला मृत समजल्याने कुटुंबीयांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत नेलं. मात्र अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच हा वृद्ध शुद्धीवर आला. या घटनेमुळे उपस्थित लोक हैराण झाले.
सदरच्या वृद्ध व्यक्तीला द्वारकामधील व्यंकटेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  या व्यक्तीला कॅन्सरची लागण झाली होती. मात्र व्हेंटिलेटरचा खर्च परवडत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना घरी नेलं. विशेष म्हणजे रूग्णालयातून डिस्चार्ज करताना कुटुंबीयांनी डॉक्टरांचा सल्ला देखील घेतला नाही. त्यामुळे रुग्णालयातून या व्यक्तीला डिस्चार्ज देताना रुग्णालयाने डिस्चार्ज पेपरवर लेफ्ट अगेन्स्ट मेडिकल अॅडव्हाइस असं लिहिलं होतं.
व्हेंटिलेटरवरून काढल्यानंतर वृद्धाचा श्वासोच्छ्वास थांबला आणि त्यांचा मृत्यू झाला असं कुटुंबीयांना वाटलं. या सर्व घटनेनंतर वृध्दाला अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेण्यात आलं. मात्र जेव्हा चितेवर मृतदेह ठेवण्याची वेळ आली तेव्हा त्यांचा श्वास सुरु असल्याचं लक्षात आलं.
वृद्ध शुद्धीवर आल्यानंतर 100 क्रमांकावर फोन करण्यात आला. यानंतर या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं. दरम्यान पोलीस सदर घटनेचा तपास  करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here