आझादी का अमृत महोत्सव … तेलंगशी शाळेच्या 75 विद्यार्थ्यांनी लिहिले पंतप्रधानांना पञ           

0
219
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – – (सुदाम वराट) 
  संपूर्ण भारतात 2021 हे वर्ष आझादी का अमृत महोत्सव म्हणून साजरे केले जात आहे.भारतीय पोस्ट विभागामार्फत 75 लाख पोस्ट कार्ड ही विशेष  स्पर्धा आयोजित केलेली आहे.या स्पर्धेत जामखेड तालुक्यातील जि.प.कें.प्रा.शाळा तेलंगशी या शाळेतील चौथी ते सातवीच्या 75 विद्यार्थ्यांनी देशाच्या पंतप्रधानांना पञ लिहिले आहे.
    विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासात गुणवत्तेइतकेच जीवनकौशल्ये विकसन व मूल्यसंवर्धन  याला विशेष महत्त्व आहे.बालवयातच राष्ट्रभक्तीसारखे  विविध मूल्ये रुजवून सर्जनशील व चिकित्सक विचार या जीवन कौशल्यांचा विकास हा शालेय उपक्रमांतून होत असतो.शालेय स्तरावर आयोजित केलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अभियानाअंतर्गत ‘भारत 2047 साठी माझा दृष्टीकोन’ या विषयावर शाळेतील 75 विद्यार्थ्यांनी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना पञातून आपले विचार व्यक्त केले आहेत.आजच्या तंञज्ञानाच्या युगात लोप पावत असलेली पञलेखन पद्धत विद्यार्थ्यांना अवगत व्हावी हाही यामागचा उद्देश आहे.या उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक आनंता गायकवाड, संतोष गोरे,सुशेन चेंटमपल्ले,विजयकुमार रेणुके ,लक्ष्मी जायभाय व मच्छिंद्र देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.
 पोस्ट विभागातील अधिकारी महेश दांगट,अविनाश ओतारी,बळी जायभाय व प्रविण मोरे यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
                                                 शाळेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केंद्रप्रमुख मुकुंदराज सातपुते,गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे  गटविकासअधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here