जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आता मतदारसंघातील शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती घडणार आहे. कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे शुक्रवारी नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. राशीन येथील जगदंबा विद्यालय येथे सफर अंतराळाची, शाळा तिथे ग्रंथालय, डिजिटल शाळा आणि शालेय चष्मे वाटप या उपक्रमांचे उद्घाटन कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
सफर अंतराळाची या उपक्रमातून शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राविषयी कुतूहल आणि गोडी निर्माण होईल तसेच हा उपक्रम जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देणारी ही राज्यातील नाही तर देशातील पहिली घटना आहे हे विशेष.
युवकांना कायमच प्रेरणा देणारे आणि कायम विद्यार्थी आणि युवा वर्गासाठी कार्यरत असणारे आमदार रोहित पवार यांनी या कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं. तसेच मतदारसंघातील अशा अभिनव शैक्षणिक उपक्रमांमुळे कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे विद्यार्थ्यांची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत आहे. मतदारसंघातील 200 शाळांना पहिल्या टप्प्यात डिजिटल पॅनेलचं वाटप रोहित पवारांनी केलं होतं. ज्याचा फायदा 20 हजार विद्यार्थ्यांना होत आहे. आता दुसऱ्या टप्प्यात 200 शाळांना डिजिटल पॅनेलचं वाटप करण्यात येणार आहे, ज्याचा फायदा तब्बल 17 हजार मुलांना होणार आहे. तसेच यावेळी विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करून शालेय चष्मे वाटप उपक्रम राबवण्यात आला आहे.
संबंधित कार्यक्रमास प्रांतअधिकारी श्री. अजित थोरबोले, गटविकास अधिकारी श्री. अमोल जाधव, गटशिक्षण अधिकारी श्रीमती शिवगुंडे मॅडम, जिल्हापरिषद सदस्य श्री. राजेंद्र गुंड, प्राचार्य श्री. खंडागळे, ग्यान-की फाऊंडेशनचे श्री. प्रदीप लोखंडे, सौ मनीषाताई जाधव, श्री. राजेंद्रकाका गुंड, विजयनाना मुढके, श्री. माऊली सायकर, श्री. दादासाहेब परदेशी, श्री. शहाजीराजे भोसले, श्री. रामकिसन साळवे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.