जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटना सहविचार सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी शिक्षकांच्या अडीअडचणी, लढा निधी, सभासद नोंदणी
नविन शैक्षणिक धोरण याविषयी सविस्तर चर्चा झाली.
श्री नागेश विद्यालयात सहविचार सभा संपन्न झाली यावेळी नागेश विद्यालयाचे प्राचार्य बी. के. मडके, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पी. टी. गायकवाड, माजी अध्यक्ष दिलीप ढवळे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश अडसुळ, टीडीएफचे माजी अध्यक्ष श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक डी. एन. साळवे सर, भरत लहाने, सचिव रमेश बोलभट सर, दत्तात्रय ढाळे, संजय हजारे, भास्कर साळुंखे, यादव सर, मयुर भोसले सर, रघुनाथ मोहळकर सर, राजकुमार थोरवे, इथापे सर, बाजीराव गर्जे सर, महादेव मत्रे, सोनवणे सर, सुग्रीव ठाकरे सर, सुर्यकांत कदम सर
आदर्श शिक्षक पांडुरंग मोहळकर, पत्रकार सुदाम वराट
यांच्या सह अनेक शिक्षक पदाधिकारी व शाखा प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा उपाध्यक्ष रमेश अडसुळ यांनी बोलताना सांगितले की, कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला कि संघटना आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहते. आपण सर्वांनी संघटनेसाठी योगदान द्यावे असे आवाहन रमेश अडसूळ सर यांनी केले.
टीडीएफ संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीधर जगदाळे यांनी सांगितले की, शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न संघटनेच्या माध्यमातून मार्गी लागले. शाखा प्रतिनिधींनी आपल्या शाखेतील शिक्षकांच्या अडीअडचणी सांगाव्यात. नवीन शैक्षणिक धोरणाचा सर्वाचा स्वीकार करावा असे आवाहन केले.
नागेश विद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य बी. के मडके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, संघटनेच्या सर्व सदस्यांनी आपले योगदान संघटनेसाठी योगदान द्यावे गणित व विज्ञान संघटनेच्याही अशाच सहविचार सभा आयोजित कराव्यात संघटना पदाधिकारी यांनीही आपला कारभार पारदर्शक करावा. कोणतेही काम मार्गी लावण्यासाठी एकजूट सर्वात महत्त्वाची आहे.
दिलीप ढवळे यांनी बोलताना सांगितले की,
सर्व शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पी. टी. गायकवाड यांनी सांगितले की, संघटनेच्या माध्यमातून नविन शैक्षणिक धोरणाविषयी आपण तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊ व आपल्या तालुक्याचा शैक्षणिक दर्जा निश्चितपणे उंचावू असे सांगितले.
यावेळी तालुक्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
पांडुरंग मोहळकर व मराठी साहित्य प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पत्ररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सुदाम वराट यांचा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमेश बोलभट यांनी केले. तर आभार दत्तात्रय ढाळे यांनी मानले