जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
कर्जत जामखेड तालुक्यातील बेरोजगार तरुणांसाठी आमदार रोहित पवार यांच्या अभिनव संकल्पनेतून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेद्वारे ‘माझा व्यवसाय, माझा हक्क’ या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. बेरोजगार तरुणांसाठी स्वयंरोजगार प्रकल्प उभा रहावा हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
शुक्रवारी राशीनच्या जगदंबा मंदिर निवासस्थान येथे आमदार रोहित पवार यांनी ‘माझा व्यवसाय माझा हक्क’ या योजनेचे निकष पूर्ण केलेल्या 30 युवकांना 30 टेम्पोचे वाटप केले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.अतुल दवंगे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. बी आर मुंडे, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक श्री. सागर नाईक, सांगली जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, सौ. मनीषाताई जाधव,श्री. माऊली सायकर, श्री. दादासाहेब परदेशी, श्री. युवराज भोसले, श्री. हरिभाऊ पाडुळे, माधुरीताई व श्री. किसन पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
‘माझा व्यवसाय माझा हक्क’ या योजनेमार्फत कर्जत जामखेडमधील तरुणांना रोहित पवारांची कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था तसेच जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडून सहकार्य केलं जातं. तसेच या योजनेच्या लाभार्थ्यांना 25 ते 35 टक्के शासनाकडून अनुदान दिलं जातं.
तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करून आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील अर्थ व्यवस्थेलाही गती मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे.