जामखेड न्युज – – –
नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीचो मतमोजणी आज मंगळवारी करण्यात आली. माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलेले सहकार पॅनेलचे शहर विभागातील सर्व दहा उमेदवार आणि ग्रामीणचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. शहरांमध्ये दहा जागांसाठी मतदान झाले होते. यासाठी सहकार पॅनलचे दहा तर इतर चार अपक्ष असे 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
मतमोजणीच्या तीन फेऱ्या होत्या. पहिल्या,दुसऱ्या आणि तिसऱ्या अशा तीनही मतमोजणीच्या तीनही फेऱ्यांत सहकार पॅनलच्या चौदाही उमेदवारांनी एकतर्फी आघाडी घेतलेली दिसली. विरोधात असलेल्या अपक्ष उमेदवार यांना मिळालेली मते पाहता सभासद मतदारांनी एकूणच त्यांना नाकारल्याचे दिसते. विरोधी गटाचे राजेंद्र गांधी यांनी गेल्या दोन-एक वर्षात ‘सहकार’च्या माजी संचालकां विरोधात केलेली विविध माध्यमातून राबवलेली प्रचार मोहीम आणि सुरुवातीला अर्ज भरून निवडणुकीत आणलेली रंगत मात्र अर्ज माघारीच्या दिवशी विरोधी बँक बचाव समितीच्या सर्व उमेदवारांच्या अर्ज माघारीने संपुष्टात आली होती. मात्र राजेंद्र गांधीने केलेली वातावरण निर्मितीचा फायदा अपक्ष सात उमेदवारांना मिळतो का याची उत्सुकता होती. मात्र अपक्षांना मिळालेली मते पाहता एकूणच निवडणूकित माजीमंत्री स्व.दिलीप गांधी यांचाच वरचष्मा राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
सहकार पॅनलच्या उमेदवारांना पडलेली मते-
शहर विभाग-
1)अजय बोरा- 16323 (विजयी)
2)अनिल कोठारी- 16174 (विजयी)
3)ईश्वर बोरा- 16149 (विजयी)
4)गिरिष लाहोटी- 15738 (विजयी)
5)दीप्ती सुवेंद्र गांधी- 16171 (विजयी)
6)महेंद्र गंधे- 15885 (विजयी)
7)राजेंद्रकुमार अग्रवाल- 15861 (विजयी)
8)राहुल जामगावकर- 15806 (विजयी)
9)शैलेश मुनोत- 15963 (विजयी)
10)संपतलाल बोरा- 15325 (विजयी)
शाखा विभाग
11) कमलेश गांधी (विजयी)
12)अतुल कासट (विजयी)
13)अशोक कटारिया (विजयी)
14)सचिन देसरडा (विजयी)
अपक्ष उमेदवारांना मिळालेली मते-
शहर विभाग
1)अनिल गट्टाणी- 1520 (पराभूत)
2)दीपक गुंदेचा- 2503 (पराभूत)
3)स्मिता पोखरणा- 1566 (पराभूत)
4)संजय ढापसे- 1039 (पराभूत)
5)गणेश राठी- (पराभूत)
6)रज्जाक इनामदार- (पराभूत)
7)रमनलाल भंडारी(जैन)- (पराभूत)