जामखेड न्युज – – –
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची कार्यसेवेची मुदत संपली. कुंटे यांना तीन महिने मुदतवाढ मिळावी म्हणून राज्यसरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता.
प्रस्ताव तीन महिन्यापूर्वीच पाठवूनही आज सीताराम कुंटे यांचा कार्यसेवेच्या अखेरच्या दिवशी पर्यंत केंद्राने प्रस्ताव मान्य केल्याचे पत्र न आल्याने अखेर कुंटे यांना नियमानुसार पदावरून निवृत्त व्हावे लागत आहे.
या दरम्यान राज्यशासनाने आता राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून देबाशीष चक्रवर्ती यांची नियुक्ती केली आहे. देबाशीष चक्रवर्ती हे नियोजन विभागाचे मुख्य उपसचिव पदावर कार्यरत होते.
सीताराम कुंटे यांना मुदत वाढ मिळावी असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवूनही तो मंजूर न झाल्याने एक प्रकारे केंद्राकडून राज्यसरकरची पुन्हा एकदा कोंडी केली असल्याचे बोलले जातेय.