जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जागतिक स्थित्यंतरात लेखकांचा वाटा बहुमोलाचा आहे. ग्रंथ वाचनाने समाज सुसंस्कृत व प्रगत होतो. म्हणून समाजात ग्रंथ वाचन वाढले पाहिजे. आज टि.व्ही., मोबाईलच्या धावत्या काळात वाचन संस्कृती बळकट करण्याची गरज आहे.ग्रंथ वाचनाने मनाची मशागत होऊन ज्ञान प्रगल्भ होते” असे विचार गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी व्यक्त केले.
ADVERTISEMENT

जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने नुकतेच श्री नागेश विद्यालयात परिसरातील कवींचे कविसंमेलन व प्रसिद्ध साहित्यिक आ.य.पवार लिखित “करकुंजाचा थवा (बाल साहित्य) आणि “सीनाकाठच्या कविता”(काव्यसंग्रह) या पुस्तकांच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन माजी.जिल्हा परिषद सदस्य प्रा.मधुकर राळेभात यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोळ साहेब बोलत होते.
उपप्राचार्य प्रकाश तांबे यांनी समारंभाचे प्रास्ताविक करून सर्व उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिष्ठानचे वतीने मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.लेखक आ.य.पवार यांनी या दोन्ही पुस्तकांतील निसर्ग वास्तव याच परिसरातील असल्याचे सांगून पुस्तकांच्या चौथ्या आवृत्ती संदर्भात मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवर व कवींच्या हस्ते दोन्ही पुस्तकांच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन टाळ्यांच्या गजरात संपन्न झाले. त्यानंतर परिसरातील कवींचे कविसंमेलन झाले. डॉ संजय राऊत, कु. मत्रे शिवगंगा, रंगनाथ राळेभात, डॉ. जतीन काजळे, कुंडल राळेभात, प्रा.ज्ञानेश्वर शेटे, संजय वारभोग,
प्रा.विनोद सासवडकर इ.कवींच्या प्रेम, शेतकरी जीवन, पर्यावरण, निसर्ग, समाज जीवन,व विनोदी कवितांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली. अध्यक्षीय भाषणात
प्रा.मधुकर राळेभात यांनी सर्व कवींचे कौतुक करून मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या कार्याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन रमेश बोलभट यांनी केले, आभार मयुर भोसले यांनी मानले.कार्यक्रमास डॉ विद्या काशीद, स्कूल कमिटीचे अध्यक्ष हरिभाऊ बेलेकर, प्राचार्य कुसुम चौधरी, प्राचार्य बी.के मडके, प्रा.मयुर भोसले आदींसह कन्या विद्यालय व नागेश कनिष्ठ महाविद्यालयातील स्टाफची उपस्थिती होती.