जामखेड न्युज – – –
औरंगाबाद रोडवर जेऊर जवळ असणाऱ्या एका वस्ती जवळ पहाटेच्या सुमारास बिबट्याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला जेऊर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचे अधून मधून दर्शन होत होते. ग्रामस्थांनी या भागात पिंजरा लावण्याची मागणी केली होती. काही पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केला होता.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या बिबट्याच्या अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघातात मृत्यू झाल्याचं समोर आल्यानंतर वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.