२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन विशेष

0
292
जामखेड न्युज – – – 
संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
                            ADVERTISEMENT
           
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सूपुर्द करतांना, २६ नोव्हेंबर, १९४९. भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.  २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.
[
बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहले कि, त्याच पुस्तकावर आज हा भारत देश चालतो….ते म्हणजे भारतीय संविधान!
सुरुवातीला एकूण ३८९ सदस्य पैकी फाळणीनंतर २९९ सदस्यांनी १०८२ दिवसांनी म्हणजे  दोन वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांत जवळपास १२००० पानांचे महान असे संविधान लिहिले. भारतीय संविधानात एकूण १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या  मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत.
संविधान दिन दरवर्षी २६  नोव्हेंबर रोजी भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.  १९४९ साली या दिवशी भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली.  भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक कोटी लोकांनी अथक परिश्रम केले आणि त्यांच्या कष्टाचे आणि संघर्षाचे फळ म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.  देशाच्या स्वातंत्र्यानंतर, देशाला एक मजबूत संविधान प्रदान करण्याचे सर्वात मोठे काम होते, ज्याचा मसुदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला होता.  जगातील विविध देशांच्या राज्यघटनेतील विशेष गोष्टी भारतीय संविधानात मिसळून सशक्त आणि न्याय्य प्राप्त झाल्या आहेत.
 संविधान सभेचे सदस्य भारतातील राज्यांच्या विधानसभांच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे निवडले गेले.  जवाहरलाल नेहरू, डॉ. भीमराव आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद आदी या विधानसभेचे प्रमुख सदस्य होते.
 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आणि डॉ. भीमराव आंबेडकर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.  जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद आदी या विधानसभेचे प्रमुख सदस्य होते.
 26 नोव्हेंबर 1949 मध्ये, म्हणजेच या दिवशी भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली.  डॉ भीमराव आंबेडकर यांनी दोन वर्षे 11 महिने 18 दिवसात संविधान तयार करून राष्ट्राला समर्पित केले.  आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान मानले जाते.  26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली.  भारत सरकारने 2015 मध्ये प्रथमच “संविधान दिन” साजरा केला.  डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाचे महत्त्व सर्वत्र पसरवण्यासाठी “संविधान दिन” साजरा केला जातो.
राज्यघटनेचा मसुदा तयार करताना टंकलेखन किंवा छपाईचा वापर केलेला नाही. भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले. तसेच आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.भारतीय संविधानाची मूळ संसदेच्या वाचनालयातील हिलियम भरलेल्या बॉक्समध्ये ठेवलं आहे.
शेवटी एकच म्हणतो-
घटना अशी लिहिली की
सूर्य चंद्र असे पर्यंत मिटणार नाही…
 ऋण  बाबासाहेबांचे या जन्मांत फिटणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here