बनावट दूध पावडरपासून केमिकलयुक्त खवा तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई

0
242
जामखेड न्युज – – – 
तुम्ही सणावाराच्या काळात जो खवा खाल्ला तो बनावट तर नव्हता ना? हा प्रश्न आम्ही विचारतोय कारण केज पोलिसांनी केलेल्या कारवाईत हे समोर आले आहे. केज जवळ असलेल्या उमरी येथे केमिकलयुक्त खवा तयार करणाऱ्या फॅक्टरीचा पर्दाफाश झाला आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
                       ADVERTISEMENT
        ऍड
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. केज-बीड रोडवर विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासमोर उंमरी शिवारात व्हर्टिकल फुड्स राधाकृष्ण कंपनी येथे बनावट दूध पावडरपासून खवा निर्मिती करून विक्री केली जात असल्याची माहिती समजल्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकला.
धनंजय महादेव चौरे हे त्यांच्या कंपनीमध्ये दुधाचे पावडर पासून बनावट खवा तयार करून त्याची बाहेर जिल्ह्यात विक्री करतात अशी खात्रीलायक बातमी मिळाली होती. त्यानंतर सदर ठिकाणी एफडीएचे सहाय्यक आयुक्त सय्यद हस्मी व त्यांच्या सोबत अन्न सुरक्षा अधिकारी तन्मडवार व त्यांच्या पथकांच्या मदतीने दोन पंचांसह सदर कंपनीच्या ठिकाणी जाऊन रात्री नऊ वाजता छापा मारला.
सदर ठिकाणी दुधाच्या पावडरमध्ये वनस्पती तेल मिक्स करून, त्यापासून तयार केलेले खव्याचे पदार्थ संशयित वाटल्याने सदर ठिकाणाहून 5 लाख 37 हजार 480 रुपयांच्या  2958 किलोग्राम इतक्या प्रमाणात  खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे नमुने सीए तपासणी कामे काढून घेऊन ताब्यात घेतले असून सदरची कंपनी पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here