अरणगाव ग्रामपंचायतच्या निकालाला स्थगिती – सरपंच अंकुश शिंदे यांच्या बाजूने न्यायालयाचा निकाल

0
293
जामखेड प्रतिनिधी 
          जामखेड न्युज – – – 
  तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच गाजली होती सरपंच उपसरपंच निवडीवेळी शिंदे गटागडे एक सदस्य कमी आसतानाही सर्जिकल स्ट्राईक करत विरोधी गटाचा एक सदस्य फोडून शिंदे गटाचा सरपंच उपसरपंच झालेला होता त्यामुळे विरोधी गटाने सरपंच उपसरपंच निवडी विरोधात जिल्हाधिकारी आपील करण्यात आले जिल्हाधिकारी यांनी निवडी रद्द केल्या तेव्हा त्या विरोधात आयुक्तांकडे न्याय मागितला पण आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांचा निर्णय कायम ठेवल्याने अंकुश शिंदे यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली न्यायालयाने जिल्हाधिकारी व आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती दिली त्यामुळे पुन्हा एकदा सरपंच पदी अंकुश शिंदे व उपसरपंचपदी सविता राऊत यांची निवड कायम करण्यात आली आहे.
                      ADVERTISEMENT 
राजकीय घडामोडी नंतर आरणगाव ग्रामपंचायतला पॅनल प्रमुख अमोलशेठ शिंदे व माजी सरपंच भाजपचे तालुका सरचिटणीस लहू शिंदे यांनी जादूची कांडी फिरवली आणि आरणगाव ग्रामपंचायत प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात सरपंच पदी अंकुश अरुण शिंदे व उपसरपंच पदी सविता आप्पासाहेब राऊत यांची निवड झाली परंतु राजकीय  नाट्य मुळे विरोधी गटांना ही निवड मान्य नव्हती त्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय येथे धाव घेतली व 2 ते 3 तारखा नंतर राजकीय दबावामुळे जिल्हाधिकारी यांनी सदर ची याचिका मंजूर करून सरपंच व उपसरपंच निवड बेकायदेशीर ठरवून ग्रामसेवक यांचा लेखी जबाब घेऊन दबाव टाकून याचिका मंजूर केली व निवड फेर घेण्यात यावी या निकाला विरोधात सरपंच अंकुश शिंदे यांनी विभागीय आयुक्त नाशिक येथे धाव घेतली परंतु विभागीय आयुक्त यांनी  याचिका फेटाळली व जिल्हाधिकारी यांची याचिका कायम ठेवली
                       ADVERTISEMENT
सरपंच अंकुश शिंदे यांनी मा जिल्हाधिकारी व अप्पर आयुक्त यांच्या आदेशाच्या विरोधात मा उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ऍड अभिजित मोरे यांच्या मार्फत याचिका दाखल केली मा उच्च न्यायालायाने ऍड अभिजित मोरे यांच्या युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हाधिकारी तथा अप्पर आयुक्त यांच्या आदेशास स्थगिती दिली आहे त्यामुळे आरणगाव ग्रामपंचायत सरपंच अंकुश शिंदे व उपसरपंच पदी सौ सविता आप्पसाहेब राऊत पदी कायम मा उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी व अप्पर आयुक्त तसेच निवडणूक निर्णय आधिकारी व तत्कालीन ग्रामसेवक यांना नोटिस काढले आहेत.
                        ADVERTISEMENT  
या निवडी बद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे, खासदार सुजय दादा विखे पाटील, मा सभापती डॉ भगवान मुरूमकर, उपसभापती रवी सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, अनिल लोखंडे, जिल्हा बँकेचे संचालक अमोलशेठ राळेभात, सुधीर राळेभात, सभापती गौतम उतेकर, तालुका अध्यक्ष अजय दादा काशिद, युवा मोर्चा अध्यक्ष शरददादा कार्ले व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व आरणगाव ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
                       ADVERTISEMENT
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here