जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड शहरासाठी शाश्वत १४० कोटींच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाचा, तसेच जामखेड शहरातील व तालुक्यातील अशा २२७ कोटी ७७ लाख ६६ हजार रकमेच्या विविध विकासकामांचा एकत्रित भूमिपूजन सोहळा दि १३ रोजी उपमुख्यमंत्री तथा मंत्री- वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री मंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत जामखेड येथील बाजार तळावर वेळ: सकाळी १०.०० वाजता होणार आहे या कार्यक्रमाची जोरदार तयारी बाजारावर सुरू आहे.
ADVERTISEMENT

जामखेड शहर व अंतर्गत वाड्या वस्त्यांसाठी उजनी धरणातून १४० कोटी पाणीपुरवठा योजना जामखेड शहरातील रस्त्यांसाठी १५ कोटी, सार्वजनिक सभागृहासाठी १ कोटी ५०लाख, तालुक्यातील तलाठी कार्यालयासाठी ८कोटी ८२लाख २८हजार, व्यापारी संकुलासाठी ९कोटी, शासकीय विश्रामगृहासाठी ४कोटी ३०लाख ७०हजार, पंचायत समितीच्या दुसर्या मजल्यावरील कार्यालयासाठी ३कोटी ८८लाख ९० हजार, तसेच पंचायत समितीच्या पदाधिकारी व कर्मचारी निवासस्थाना साठी १०कोटी ९१लाख, पोलीस अधिकारी व कर्मचारी वसाहतीसाठी ८कोटी ८९लाख, महसूल कर्मचारी निवासस्थानासाठी १२कोटी ६लाख ७८हजार, बसस्थानक व बसस्थानकावर व्यापारी संकुलासाठी ७कोटी ८९लाख, सार्वजनिक वाचनालयासाठी १कोटी ५०लाख, नाना नानी पाकँ साठी २कोटी, तपनेश्वर आमरधाम साठी २ कोटी असे एकुण २२७ कोटी ७७ लाख ६६ हजार निधीच्या कामांचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सह विविध खात्याचे सहा मंत्री उपस्थित राहणार आहेत. बाजारतळावर हा कार्यक्रम असल्याने जोरदार तयारी सुरू झाली आहे. दररोजचा बाजार तपनेश्वर रोडवर हलविण्यात आला आहे तसेच स्टेज व मंडप देण्याचे काम सुरू आहे.
ADVERTISEMENT

यातील बसस्थानक व पोलीस वसाहतीचे काम सुरू झाले आहे. बाकी कामांचे भूमिपूजन होणार आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाची विकासाच्या बाबतीत माॅडेल मतदारसंघ बनविण्यासाठी आमदार रोहितदादा पवार हे प्रयत्न करत आहेत. त्यादृष्टीने अनेक कामांना मंजुरी मिळवली आहे काही कामे सुरू आहेत तर काही सुरू होणार आहेत. लवकरात लवकर कर्जत-जामखेड मतदार संघ विकासाच्या बाबतीत माॅडेल ठरेल असे आमदार रोहित पवारांनी सांगितले आहे त्यादृष्टीने कामे सुरू आहेत.