जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ यांच्या मातोश्री अनुसया अजिनाथ वाघ यांचे अल्पशा आजाराने १ वाजता दुःखद निधन झाले. अंत्यविधी सायंकाळी ५:३० वाजता वाघवस्ती, कोरेगाव (कर्जत) येथे झाला असून त्यांच्यामागे पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्या स्वतः धार्मिक वृतीच्या होत्या मुलांना चांगले संस्कार दिले त्यामुळे आज त्यांच्या थोरल्या मुलाने वैद्यकीय क्षेत्रात नाव कमावले आहे अंत्यविधीला जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, प्रवीण मंडलेचा ,मछिंद्र रणसिंग, राहुल वासकर, सरपंच काका शेळके, डॉ श्रीकांत फाळके, डॉक्टर विजयकुमार चव्हाण, सुरेशशेठ तोरडमल, स्वप्निल देसाई, संजय भैलुमे, संजय शेळके, सखेचंद अनारसे, उद्योजक श्रीकांत तोरडमल, प्राध्यापक संजय देशमाने आदी ग्रामस्त उपस्थित होते.