जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
खर्डा येथील ऐतिहासिक किल्ल्या समोर स्वराज्य ध्वजाच्या पायथ्याशी पाडव्याच्या दिवशी तोफांच्या आतिषबाजी, आकाश कंदील व दिव्यांच्या झगमगटात दिवाळी साजरी करण्यात आली.
ADVERTISEMENT 

याबाबत माहिती अशी की, आमदार रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतुन भारतातील सर्वात उंच स्वराज्य ध्वज उभारण्यात आला आहे.या ठिकाणी हळूहळू मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देऊ लागले आहेत,यामुळे खर्डा गावाचे नाव पूर्ण देशात झळकले. कोरोना ची लाट नसल्याने सध्या दिवाळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे,यासाठी खर्डा येथील रोहितदादा पवार विचार मंचाचे अध्यक्ष व पत्रकार दत्तराज पवार यांनी पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी स्वराज्य ध्वजाच्या पायथ्याशी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला.
ADVERTISEMENT 

यासाठी या ठिकाणी किल्ल्याची प्रतिकृती व जाणता राजा नाव असलेला आकाश कंदील तयार करण्यात आला, महिलांनी सुंदर रांगोळी काढली व मोठ्या प्रमाणात दिवे लावण्यात आले, त्यानंतर फटाके व भव्य तोफांची आतिषबाजी करण्यात आली.
ADVERTISEMENT 

आपल्या घरीच दिवाळी साजरी केल्याचा आनंद कार्यकर्त्यांनी व महिला भगिनींनी यावेळी घेतला,येथून पुढे प्रत्येक दीपावली पाडव्याच्या दिवशी स्वराज ध्वजाच्या समोर दिवाळी साजरी करण्याचा निर्णय उपस्थित कार्यकर्त्यांनी घेतला.
ADVERTISEMENT 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या सौ.सुनीता जावळे, मा.ग्रामपंचायत सदस्या सौ.शीतल शिंदे,महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ.नीता पवार, मा.ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब ढगे, विकास शिंदे, भीमराव घोडेराव, दीपक जावळे यांनी सहकार्य केले यावेळी पर्यटक व बहुसंख्य लोक उपस्थित होते.
ADVERTISEMENT
